Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पहिल्या फोटोत पूजाने गुलाबी रंगाची नववारी साडी नेसली आहे. साडीचा पदर केल्याने तिचा हा मराठीलूक एकदम खुलून दिसतोय. तिच्यावर हा रंग अगदी गोड आणि सुंदर वाढतोय. ही साडी कोणत्याही सणाला सहज नेसता येईल अशी आहे.
दुसऱ्या फोटोत तिचे दागिने दिसत आहेत. तिने गळ्यात ठुशी सारखा दागिना घातला नेकलेस् घातला आहे. तसेच कानात सोन्याचे झुमके घातल्याने लूकमध्ये कुठेही भडक न वाटता मराठमोळा सौंदर्य दिसतयं.
तिसऱ्या फोटोमध्ये तिचा मेकअप जवळून दिसतोय. पूजाने कुठेही जास्त मेकअप केला नसून डोळ्यांना थोडसं काजळ, हलकी लिपस्टिक लावली आहे.
पुढच्या फोटोत तिची केशरचना बघा. साडीवर केस कसे बांधायचे हे खूप महत्त्वाचं असतं. पूजाने केस खूप सुंदर बांधले आहेत. कधी मोकळे केस तर कधी अंबाडा, पण तिने जे केलंय ते साडीवर एकदम सूट होतंय. साडी, दागिने, मेकअप आणि केस, सगळ्यांचा मेळ अगदी परफेक्ट बसला आहे.
हा लूक बघितला तुम्ही गणपती, गौरी, दिवाळी किंवा लग्नात करु शकता. एक चांगली गुलाबी साडी, सोन्याचे दागिने आणि साधा मेकअप एवढं घेतलं की, झाला तुमचा पूजासारखरा लूक तयार.
शेवटच्या फोटोत ती हसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतोय. तिने हे फोटो टाकल्यावर लोकांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. सगळेच म्हणत आहेत की गुलाबी साडीत ती खूपच गोड दिसते. खरं आहे, पारंपरिक कपडे घातले की आपल्या अंगात एक वेगळाच आत्मविश्वास येतो. पूजाने तोच आत्मविश्वास या फोटोतून दाखवला आहे. साधं राहून पण उठून कसं दिसायचं, हे तिच्याकडून शिकण्यासारखं आहे.