पूनम पांडेच्या मृत्यूच्या (Poonam Pandey Death) बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. 32 वर्षीय पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical cancer) झाला होता यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. याबाबत पूनमच्या बॉडीगार्ड अमीन खानने आजतकशी बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे. तो म्हणाला, की ‘पूनम आता आपल्यात नाही हे मानायला माझे मन तयार नाही. तसेच त्याने शेवटच्या वेळी तो तिच्यासोबत कधी आणि कुठे होता हे सांगितले आहे.
[read_also content=”श्रेयस तळपदेचं रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक; महेश मांजरेकरांच्या चित्रपटात झळकणार प्रमुख भूमिकेत! https://www.navarashtra.com/movies/shreyas-talpade-will-be-seen-in-mahesh-manjrekar-film-in-the-lead-role-nrps-504113.html”]
अमीन खानने सांगितले की, शेवटची वेळ 29 जानेवारीला पूनमसोबत होती. कार्यक्रमानंतर त्याने तिला घरी सोडले. ती कुठल्यातरी आजाराने त्रस्त असल्याची बातमी त्याच्यापर्यंत कधीच पोहोचली नव्हती. तो गेल्या 10 वर्षांपासून पूनमसोबत बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीने त्याला धक्का बसला आहे. ही बातमी खरी की खोटी हे मला माहीत नाही, असे तो म्हणतो.
तचेस पूनमचे कुटुंबीय, तिची बहीण फोन उचलत नसल्याचही तो म्हणाला. 29 जानेवारीला मी मॅडमला शेवटचं घरी सोडलं. मुंबईत रोहित वर्माचे फोटोशूट झालं. फोटोशूट संपल्यानंतर मी तिला घरी सोडलं. मला किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला आजारपणाबद्दल कधीही माहिती दिली गेली नाही. आम्ही घरात गेलो, पण चौकीदाराने आत कोणीही जायचे नाही म्हणून नकार दिला.
पूनम पांडेचा मृत्यू सर्वांसाठी एक गूढ बनला आहे. कालपर्यंत पार्टीत मस्ती करताना दिसलेल्या पूनमने अचानक जगाचा निरोप घेतला. सामान्य जनता आणि सेलेब्स सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत आहे.