
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरने हे चित्रपटावर केले आरोप
लाइव्ह लॉनुसार, आरजे आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आशिष शर्माने “मस्ती ४” च्या निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्याचा दावा आहे की जानेवारी २०२४ मध्ये त्यानी रिलीज केलेली एक रील, जी व्हायरल झाली होती, ती त्याच्या संमतीशिवाय किंवा श्रेयाशिवाय चित्रपटात वापरली गेली आहे. “शक करने का नतीजा” नावाची रील त्यांनी वापरली आहे आणि आरजे तृप्तीची देखील रील यामध्ये वापरली गेली आहे. इन्फ्लुएन्सरने आता भरपाई आणि पूर्ण नफ्याचा अहवाल चित्रपट निर्मात्यांकडे मागितला आहे, असा आरोप करत की त्याच्या सर्जनशील मालमत्तेचा वापर त्याच्या संमतीशिवाय करण्यात आला आहे.
निर्मात्यांना पोलिसांनी बजावली नोटीस
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती तुषार राव गेडेला याच्या अध्यक्षतेखाली एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना नोटीस बजावली आहे आणि पुढील कारवाईपूर्वी त्याचे त्वरित उत्तर मागितले आहे. आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जानेवारी २०२६ रोजी अपेक्षित आहे. आता या प्रकरणाचे पुढे काय हे पाहणे बाकी आहे.
“मस्ती ४” हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप
मिलाप झवेरी दिग्दर्शित “मस्ती ४” हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि तो फ्लॉप झाला. २००४ मध्ये “मस्ती” चित्रपटाचा सुरू झालेला फ्रँचायझीमधील “मस्ती ४” हा चौथा भाग आहे. यापूर्वी या फ्रँचायझीमधील तीन चित्रपट, “मस्ती”, “ग्रँड मस्ती” आणि “ग्रेट ग्रँड मस्ती” प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या चित्रपटापासून ही फ्रँचायझी एडल्ट कॉमेडी चित्रपटांची फ्रँचायझी बनली आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी चारही भागांमध्ये मुख्य भूमिकेत दिसले आहेत.