poonam pandey
मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या बोल्ड वक्तव्याने कामय चर्चेत राहणारी मॅाडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन (Poonam Panday) झाल्याचं समोर आली आहे. या संदर्भात तिच्या इन्स्टाग्राम अकांऊट वर एक पोस्ट करण्यात आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानुसार, पूनमचं निधन गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झालं आहे. पूनम पांडेची ही पोस्ट पाहून चाहत्यांना ती आता आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाहीये.
पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेविश्वासह फॅन्सनाही धक्का बसला आहे. तिच्या टिमकडून या संदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. तसेच, तिच्या टीमने याबद्दल खुलासा केला आहे. पूनम पांडेच्या टीमने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, ‘आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावल्याचे जाहीर करताना दुःख होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी त्यांनी पूर्ण प्रेम आणि दयाळूपणा दिला. या दुःखाच्या काळात, आम्ही चाहत्यांकडून गोपनीयतेची विनंती करतो, जेणेकरून आम्ही त्यांना प्रेमाने लक्षात ठेवू शकू.
रिपोर्टनुसार, पूनम पांडेच्या व्यवस्थापन टिमने या संदर्भात संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘पूनमला काही काळापूर्वी कॅन्सरने ग्रासले होते. हा शेवटच्या स्टेजचा कर्करोग होता. ती उत्तर प्रदेशमधील तिच्या गावी होती आणि तिथून उपचार घेत होती. तिच्यावर अंतिम संस्कारही तिथेच होणार आहेत.