(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हेमंत ढोमे क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम या नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधी त्याच्या ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ आणि ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याने क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम या नवीन चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केली होती.
चित्रपटाच्या घोषणेनंतरच यात कलाकार कोण असतील, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती, या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यात कलाकारांचे चेहरे जरी दिसत नसले तरी चित्रपटात दमदार कलाकारांची भक्कम फौज बघायला मिळणार हे नक्की.
प्राजक्ताने याआधी २०२० मध्ये आलेली शॉर्ट फिल्स ‘खयाली पुलाव’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’ या सीरिजमधील अभिनयाने तिने आपल्या अभिनयाकडे सर्वांचचं लक्ष वेधलं. २०२२ मध्ये चित्रपट ‘जुग जुग जिओ’ मध्ये तिने काम केले असून आता ती पहिल्यांदाच मराठी सिनेमात पदार्पण करत आहे
‘एक गई तो दूसरी आई…’, कोण आहे हार्दिक पंड्याची नवीन प्रेयसी? एका फोटोने उघड केले रहस्य
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हाणाला की, माझं शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यात झालं आहे. आता माझा हा चित्रपट जो मराठी शाळांबद्दलच आहे. या चित्रपटाचे शूटिंग मला याच भागात करता आलं याचा मला प्रचंड आनंद आहे. चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, पाहून खूप आनंद झाला, आणि चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे. माझी संपूर्ण टीम या चित्रपटाची खरी ताकद आहेत. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”
वीकेंड नंतरही ‘दशावतार’ची कोट्यावधींची घोडदौड सुरूच!
या चित्रपटात कोण कोण कलाकार?
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, तरुण पिढीचे स्टार्स अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर, लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग , कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्यासह सोशल मिडीया स्टार प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे.