Chhaava Movie: संसदेत होणार ‘छावा’चं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदार राहणार उपस्थित
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि अभिनेता विक्की कौशल, अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिकेत असलेला ‘छावा’ चित्रपटाला अजूनही प्रतिसाद मिळतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ह्या ‘छावा’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. संभाजी महाराजांचा इतिहास पहिल्यांदाच शिवभक्तांना मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळत असल्याने देशासह परदेशातून या चित्रपटाला पसंती मिळत आहे. चित्रपटाने आजवर देशभरामध्ये कोट्यवधींची उलाढाल केली आहे. त्याच अनुषंगाने आता हा चित्रपट संसद भवनात देखील दाखवला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह देशातील इतर खासदारही उपस्थित असणार आहेत.
धोका, प्रेम आणि संघर्षाचा नवा अध्याय, ‘हलगट’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
येत्या गुरुवारी म्हणजेच २७ मार्च रोजी संसदेत ‘छावा’चं स्क्रीनिंग केलं जाणार आहे. संसदेत असलेल्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये बालयोगी ऑडिटोरियममध्ये ‘छावा’ चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, संसदेतील इतर खासदारही या शोला हजर राहणार आहेत. त्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन आणि चित्रपटातले कलाकारही स्क्रीनिंगवेळी संसदेत उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदींनी याआधीच ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यामुळे ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर मोदींच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वी अर्थात ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या भाषणात ‘छावा’चित्रपटाचे कौतुक केले होते. तेव्हा त्यांनी ‘छावा’ चित्रपट धुमाकूळ घालत असल्याचे म्हटले होते.
‘तुझ्या समोर कास पठारही फेल!’ शर्वरी वाघ… तेरी अदाए है या कोई आग
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर अभिनेता विकी कौशलने त्यांचे आभार मानले होते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करीत कृतज्ञ असल्याचे म्हटले होते. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदानानेदेखील हा खरा सन्मान असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. “महाराष्ट्र आणि मुंबईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांनाही नवी उंची दिली आहे. सध्या सगळीकडे छावाची धूम पाहायला मिळत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय याच रूपाने होतो.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे कौतुक करताना म्हणाले. दरम्यान चित्रपटाने भारतात ३९ दिवसांत ५८५ कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ७८५ कोटींची कमाई केलेली आहे.
‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याने साकारलेल्या भूमिकेला देशासह परदेशातून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे. त्याचा अभिनय पाहून विकी कौशलचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे. महाराणी येसूबाईंची भूमिका ही लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय चित्रपटात संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहे. सर्वच कलाकारांचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक कंपनीने केली आहे.