कृष्ण कुमारच्या पत्नीचा लेक तिशा कुमारच्या निधनावर महत्वाचा खुलासा; म्हणाली, “माझ्या मुलीचा मृत्यू कॅन्सरने झाला नाही...”
‘बेवफा सनम’, ‘भुल भुलैया ३’, ‘भुल भुलैया २’, ‘सत्यमेव जयते २’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘आज मेरी जान’ चित्रपटासह अनेक वेगवेगळ्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेते कृष्ण कुमार सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या २० वर्षीय मुलीचं गेल्या जुलै महिन्यात कर्करोगानं निधन झालं होतं. कृष्ण कुमार यांच्या मुलीचं नाव तिशा कुमार असं असून तिचं वयाच्या २० व्या वर्षी कर्करोगाने निधन झालं होतं. लेकीच्या निधनामुळे वडील कृष्ण कुमार आणि त्यांच्या आई तान्या सिंहवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. आता तिशा कुमारची आई तान्या सिंगने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत महत्वाचं विधान केलं आहे.
समांथा रुथ प्रभूवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन
तान्या सिंगने मुलीच्या निधनाचं कारण कर्करोग नव्हता, असं मोठं वक्तव्य पोस्ट शेअर करत केलं आहे. गुरुवारी इन्स्टाग्राम अकाउंटवरून तान्या सिंग यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लेक तिशाच्या आठवणीतील काही फोटो शेअर केलेला होते. त्यांनी फोटोंचा एक व्हिडिओ बनून शेअर केलेला होता. व्हिडीओ शेअर करत त्यांनी एक मोठं कॅप्शनही दिलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये तान्या सिंग म्हणते, “गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकं नक्की काय झालं ? कसं काय झालं? असे अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज देतेय. सत्य हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे असते, व्यक्ती सत्य कशा पद्धतीने समजते यावर ते अवलंबून असते. जेव्हा एका निष्पाप जीवावर काही वाईट कृत्यांमुळे जीव जातो. त्यानंतर अचानक समजतं की, आता फार उशीर झाला आहे. पण, शेवटी देवाच्या दारात प्रत्येकाला समान न्याय मिळतो आणि त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही.”
पुढे पोस्टमध्ये तान्याने लिहिलंय की, “खरं असं आहे की, सुरूवातीच्या दिवसांत माझ्या मुलीला ‘कॅन्सर’झालेला नव्हता. ती १५ वर्षांची असताना तिला एक लस देण्यात आली होती. त्यामुळे कर्करोगासारख्या इतर रोगांवर मात करण्याची रोगप्रतिकारक शक्ती तिच्या शरीरात निर्माण झाली होती. मात्र, उपचारावेळी तिच्यावर चुकीचे निदान करण्यात आले. त्यावेळी आम्हाला हे काहीच माहीत नव्हते. आम्ही सर्वच मेडीकलच्या जाळ्यात अडकलो होतो, आम्हाला ते आधी समजले नाही. माझी मुलगी प्रत्येक स्थितीत खंबीर होती, ती केव्हाच घाबरली नव्हती. ती सर्वात निर्भीड, धाडसी आणि शांत मुलगी होती. तिला सर्वांना सांगायचं होतं की, कधीच कोणत्याही वैद्यकीय उपचाराला घाबरू नका. बायोमेडिसिनच्या मदतीने केमो साइड इफेक्ट्स यांवरही मात करता येते, हे तिला सर्वांना दाखवून द्यायचे होते.” पोस्टच्या शेवटच्या भागात तान्याने पालकांनासुद्धा महत्वाचा सल्ला दिला आहे.
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, लवकरच अडकणार लग्नबंधनात