समांथा रुथ प्रभूवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन
प्रसिद्ध बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री समांथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालं आहे. तिच्या वडिलांचं नाव जोसेफ प्रभू असं असून त्याचं निधन नेमकं कशामुळे झालेलं आहे, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. काही तासांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिने ही दु:खद बातमी सांगितली आहे. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर करत हार्ट ब्रेक इमोजी टाकत चाहत्यांना माहिती दिली आहे.
सोनी लिव सिरीज “लंपन” ने 55 व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “बेस्ट वेब सिरीज” पुरस्कार जिंकला!
शेअर केलेल्या इन्स्टास्टोरीमध्ये समांथाने लिहिलंय की, “बाय डॅड, जोपर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही, तोपर्यंत…” असा आशय लिहित तिने हार्टब्रेक इमोजी सुद्धा टाकलेले आहे. समंथाचे वडील जोसेफ हे तेलुगू अँग्लो इंडियन होते. तर तिच्या आईचं नाव निनेत्ते प्रभू आहे. समंथाचा जन्म चेन्नईत झाला असून आता तिच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. याचा तिला धक्का बसला आहे. नुकतंच समांथा ‘सिटाडेल हनी बनी’ सीरिजच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही दु:खद बातमी समोर आली आहे.
समांथा रुथ प्रभूवर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन
समांथाच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक वादळ येताना दिसतंच आहे. समांथाला २०२२ मध्ये मायोसायटिस नावाचा आजार डिटेक्ट झाला होता. तर २०२१ मध्ये तिचं आणि नागाचैतन्यचा घटस्फोट झाला होता. जेव्हापासून अभिनेत्रीला मायोसायटिस नावाच्या आजाराचं निदान झाले तेव्हापासून तिची तब्येत खूपच खालावली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल एका मुलाखतीत भाष्य केले होते. वडिलांच्या काही कडव्या शब्दांमुळे बालपणी अभिनेत्रीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे ती म्हणाली होती.
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, लवकरच अडकणार लग्नबंधनात
गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “मला संपूर्ण आयुष्यात स्वत:लाच सिद्ध करण्यासाठी झगडावे लागले. माझे वडील इतर भारतीय पालकांसारखेच आहेत. त्यांना वाटायचे की ते त्यांच्या कुटुंबीयाचे संरक्षण करत आहेत. पण अनेकदा त्यांनी माझ्या कौशल्यावर टीका केली आहे. ते मला म्हणायचे, तू इतकीही हुशार नाहीस, शिवाय स्मार्टही नाहीस…” अभिनेत्रीने पुढे मुलाखतीत सांगितल्यानंतर, आयुष्यभर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष केल्यानंतर, जेव्हा तिला तिच्या कामाची प्रशंसा मिळू लागली, तेव्हा तिला ते खरे आणि योग्य कसे स्वीकारावे समजत नव्हते.