झी मराठीवरील 'देवमाणूस' मालिकेची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ कायम आहे. मालिकेमध्ये कंपाऊंडरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता किरण गायकवाड ह्याने गर्लफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyan Revealed Relationship
झी मराठीवरील 'देवमाणूस' मालिकेची प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ कायम आहे. मालिकेमध्ये कंपाऊंडरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या त्याच्या खासगी लाईफमुळे चर्चेत आला आहे.
अभिनेता किरण गायकवाड ह्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी प्रेमाची कबुली देताना दिसत असून लग्नबंधनातही अडकत आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीसह टॉलिवूडमधीलही काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत.
“तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे” असं कॅप्शन अभिनेत्याने फोटोंना दिलेला आहे.
फोटोंना अभिनेत्याने पुढे कॅप्शन दिले की, “मंत्रिमंडळल्या बैठका होत राहतील ,मंत्री पद वाटत राहतील ,त्यांचं ठरतय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी “होम मिनिस्टर” ” अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
किरणची गर्लफ्रेंड वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं' आणि 'देवमाणूस २' सह वेगवेगळ्या मालिकांमध्ये अभिनय केलाय. वैष्णवी सध्या 'तिकळी' मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय.