'पुष्पा २'च्या वादग्रस्त घडामोडीनंतर दिग्दर्शकांचा धक्कादायक निर्णय, सुकुमार नेमकं काय म्हणाले ?
गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करीत असून त्यांच्या ह्या चित्रपटाने फक्त देशातच नाही जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले स्थान पक्के केले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाने १२६७ कोटींची कमाई केली असून जगभरात या चित्रपटाने १५०६ कोटींची कमाई केलेली आहे. सध्या दिग्दर्शक सुकुमार त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. नुकतंच त्यांनी रामचरणच्या ‘गेमचेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटला उपस्थिती लावली होती. या इव्हेंटवेळी त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.
१५ इतिहासकार, तब्बल २५ लेखक अन् नेहरूंचं पुस्तक; श्याम बेनेगल यांनी असा बनवला ‘भारत एक खोज’टीव्ही शो
‘पुष्पा २’च्या रिलीजनंतर चित्रपटाने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. हैद्राबादमध्ये ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली. त्यानंतर अभिनेत्याच्या घरावरही हल्ला करण्यात आला. आता या सर्व घडामोडींनंतर ‘पुष्पा २’च्या दिग्दर्शकांचं विधान चर्चेत आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये इव्हेंटमध्ये अँकरने सुकुमार यांना विचारलं की, “अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडायची आहे?” या प्रश्नावर सुकुमार यांनी उत्तर दिलं की, “सिनेमा”. सुकुमार यांचं उत्तर ऐकताच सर्वच जण चकीत झाले. इतकंच नव्हे त्यांच्या शेजारी बसलेल्या राम चरणलाही काही वेळेसाठी धक्का बसला. त्याने सुकुमार यांच्या उत्तरावर नकारार्थी मान हलवली.
SHOCKING: Sukumar wants to LEAVE Cinema🎬 pic.twitter.com/ZtbqV5I3JA
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 24, 2024
सुकुमार पुढे आणखी काही बोलण्याच्या आधीच रामचरणने दिग्दर्शकांच्या हातातून माईक घेतला आणि म्हणाले की “तुम्ही चित्रपट निर्मिती सोडू नये” सुकुमार आणि रामचरणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामचरण सध्या त्याच्या अपकमिंग ‘गेमचेंजर’ चित्रपटानिमित्त व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही दिसणार आहे. सुकुमार यांनी केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटत आहे. रामचरणप्रमाणेच अनेक चाहत्यांनाही हा धक्का बसला आहे. या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून चाहते सुकुमार यांना इंडस्ट्री न सोडण्याची मागणी करीत आहेत.
ख्रिसमसच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘मुफासा’ने मिळवले वर्चस्व; तर ‘पुष्पराज’ची वाईट अवस्था!
‘पुष्पा २’च्या प्रिमियरला हैदराबादमधील थिएटरमध्ये हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित झाले होते. प्रीमियरवेळी अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या कुटुंबातील महिलेचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असून त्या महिलेचा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये जीवनाशी झुंज देत आहे. या घटनेमुळे अल्लू अर्जुनला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. याशिवाय त्याच्या घरावर हल्ला झाला होता. या घटनांमुळे व्यथित होऊन ‘पुष्पा २’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.