४४ वर्षांच्या फिल्मी करियरला राकेश रोशन यांनी ठोकला कायमचा रामराम! 'क्रिश ४'चा उल्लेख करत केली मोठी घोषणा
‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘खुन भारी माँग’, ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘क्रिश २’, ‘क्रिश ३’ आणि अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे दिग्दर्शक राकेश रोशन यांची आपल्या चाहत्यांमध्ये विशेष ओळख आहे. राकेश रोशन हे बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनचे वडील आहेत. कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणाऱ्या राकेश रोशन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी कायमचा अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला असून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातूनही कायमचा ब्रेक घेतल्याचा सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राकेश रोशन यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा- प्रसिद्ध बॉलिवूड गायकाचा आवाजच गेला, पोस्ट शेअर करत केला स्वत:च खुलासा
यावेळी त्यांनी ‘क्रिश ४’ची घोषणा केली आहे. पण या चित्रपटाचं दिग्दर्शन ते करणार आहेत की नाही, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राकेश रोशन यांनी सांगितले की, “मला नाही वाटत की, मी पुर्वीसारखे चित्रपट आता बनवू शकेल. परंतू हे ठरलेलं आहे की, मी लवकरच ‘क्रिश ४’ची घोषणा करणार आहे.” दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगत शेअर केलं की, “हो, तो येतोय” त्यामुळे सध्या असा अंदाज लावला जात आहे की, या चित्रपटाचं दिग्दर्शनं ‘पठान’चं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा- “निले निले अंबर पर…” सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदांवर चाहते भाळले
दिग्दर्शक राकेश रोशन यांच्याबद्दल बोलायचं तर, २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या साय-फाय चित्रपट ‘कोई मिल गया’ यातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 21 वर्षे झाली आहेत. पहिल्या भागात हृतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्यासोबत प्रमुख भूमिकेत अभिनेत्री प्रीति झिंटा दिसली होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यात हृतिकसोबत प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तर तिसऱ्या भागात कंगना रणौत त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसली.
त्यामुळे आता चौथ्या भागात कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर राकेश रोशन यांनी दिग्दर्शन केलेला शेवटचा चित्रपट ‘क्रिश 3’ होता. दरम्यान, हृतिक रोशनविषयी बोलायचं तर, तो लवकरच ‘वॉर २’ आणि ‘क्रिश ४’ मध्ये दिसणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘क्रिश 4’ ची चर्चा सुरु आहे.