मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'अप्सरा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनाली कुलकर्णीने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. अभिनेत्रीने ब्लू पैठणीचा ड्रेस वेअर करून सुंदर फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.
Sonalee Kulkarni Dress
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. काही तासांपूर्वी अभिनेत्रीने काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
नेहमीच आपल्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत राहणाऱ्या सोनालीने ब्लू पैठणीचा ड्रेस वेअर करून सुंदर फोटोशूट केले आहे.
ओपन हेअर, स्मोकी मेकअप, ब्लू आय लायनर आणि कानात स्टायलिश झुमके वेअर करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्टायलिश अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं आणि फॅशनच चाहते कौतुक करीत आहेत.
"सर्दियों वाली धूप..." तिने असं कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने हा लूक तिनेच स्वत: केलेला असून तिच्या मदतीला कोणताही मेकअप आर्टिस्ट नव्हता, असं तिने स्वत: सांगितले.
सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात असून कमेंट्सच्या माध्यमातून सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.