प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार आणि गायक शेखर रावजियानीने आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ज्याच्या माध्यमातून गायकाला प्रसिद्धी मिळाली त्याबद्दल अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत एक धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी शेखर रावजियानीचा आवाज गेल्याचा खुलासा त्याने स्वत: इन्स्टा पोस्ट शेअर करत केला आहे.
हे देखील वाचा- “निले निले अंबर पर…” सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदांवर चाहते भाळले
शेअर केलेल्या पोस्टमध्ये शेखर रावजियानीने लिहिले की, “मी आजपर्यंत केव्हाच या गोष्टीवर भाष्य केले नव्हते. आज २ वर्षांपूर्वी माझा आवाजाच गेला होता. माझा आवाज गेल्याने माझे कुटुंबीय चिंतित होते. त्यांना दु:खी पाहून मलाच बरं नव्हतं वाटत. मला वाटलं होतं की मी आजच्यानंतर केव्हाच गाऊ शकणार नाही. दरम्यान, मी गायचे प्रयत्नही बंद केले होते. मी कॅलिफोर्नियाच्या सॅन डिॲगोमध्ये गेलो होतो. तिथे मला डॉ. एरिन वॉल्श यांच्याबद्दल कळालं. त्यांच्या मदतीने माझा आवाज पुन्हा येईल, त्यांच्या उपचारानेच माझा आवाज पुर्णपणे बरा झाला.”
शेअर केलेल्या पोस्टमध्ये शेखरने सांगितले की, “मी त्यांच्याकडे उपचार ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग पद्धतीने घेतले. मला आठवतंय, जेव्हा मी त्यांना सांगितलं की, मला पुन्हा गायचंय. तर त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्यांच्यासोबत बोलत असताना माझ्या डोळ्यातील अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. मी त्यांच्याकडे मदत करण्याची विनंती केली. मी माझा आवाज गमावला ही माझी चूक नाही, असे ही मी त्यांना आधीच सांगितले होते. मी आणि डॉ. एरिन खूप वेळ बोललो. त्यांच्या बोलण्याने मला खूप चांगले वाटले. त्यानंतरच मी पुन्हा गाईल, याची मला शाश्वती वाटू लागली.”
पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्याने सांगितले की, “मी जितके वेळ गाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला माझा आवाज खूपच खराब वाटत होता. त्यामुळे माझ्या गाण्यांना खूप वाईट प्रतिसाद मिळायचा. अनेकदा माझ्या आवाजाचा तिरस्कार केला जायचा. पण डॉक्टरांनी मला पुर्णपणे बरे करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांनी माझ्यावर केलेल्या उपचारामुळे मला माझा आवाज काही आठवड्यातच मिळाला.” लोकप्रिय संगीतकार विशाल-शेखर ही जोडी इंडस्ट्रीत फेमस आहे. त्यातील शेखर म्हणजेच, गायक शेखर रवजियानी होय. शेखरने १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार मे कभी-कभी’ या चित्रपटातून म्यूझिक कम्पोजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
गायक शेखरने ‘ब्लफमास्टर’, ‘ओम शांती ओम’, ‘हॅपी न्यू ईअर’, ‘सुलतान’सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी म्युझिक कम्पोज केले आहे. शेखर केवळ चांगले म्युझिक कम्पोजर नसून एक चांगले गायकही आहेत. याशिवाय शेखर यांनी अभिनय क्षेत्रातही काम केले आहे. सोनम कपूरच्या ‘निरजा’ चित्रपटात शेखर यांनी अभिनय केला होता.