Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गेम चेंजर’च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?

रामचरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाच्या ऑनलाईन पायरसी प्रकरणी ४५ जणांविरुद्ध निर्मात्यांनी तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 14, 2025 | 07:45 AM
'गेम चेंजर'च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?

'गेम चेंजर'च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?

Follow Us
Close
Follow Us:

सध्या संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपटांची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. टॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून जगभरात बक्कळ कमाई करताना दिसत आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. पण तरीही चित्रपटाला एका गोष्टीचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे, तो म्हणजे ऑनलाईन पायरसीचा…

३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीना- रणबीरच्या चुलत भावाने बांधली लग्नगाठ

‘गेम चेंजर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ३ दिवसांच्या आत निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या ऑनलाईन पायरसी प्रकरणी ४५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय निर्मात्यांनी आरोप केला आहे की ते त्यांच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नकारात्मकता पसरवत आहेत. स्त्रोतांवर विश्वास ठेवला गेला तर, चित्रपट दुर्दैवाने रिलीजच्या काही दिवसांतच पायरसीचा बळी ठरला. चित्रपट बनवण्यात खूप मेहनत आणि वेळ खर्च झाला पण त्यानंतरही हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला. आता या चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन लीक झाले आहे. या प्रकरणात, निर्मात्यांना ४५ लोकांची ओळख पटली असून त्यांनी आता 45 व्यक्तींविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.

‘मेला’मध्ये ऐश्वर्या राय साकारणार होती ‘रूपा’ची भूमिका ; दिग्दर्शकाने २५ वर्षांनंतर केला खुलासा

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टीमच्या काही सदस्यांना सोशल मीडियावर चित्रपट चालू न देण्याच्या धमक्या आल्याचेही समोर आले आहे. गुन्हेगारांनी पैशांची मागणी केली होती आणि पैसे न मिळाल्यास चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नकारात्मकता पसरवण्याची धमकी दिली होती. आता या चित्रपटाची एचडी लिंकही टेलिग्राम आणि वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक झाली आहे. ‘गेम चेंजर’ सोशल मीडिया टीमने नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी ‘गेम चेंजर’ टीमने सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. आता ज्या ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्याबद्दलचा सविस्तर तपास पोलीस करणार आहेत. ते एकटे आहेत की त्यांचा ग्रुप आहे का? अशी कामे करण्यासाठी त्यांना मदत कुठून मिळते? याशिवाय निर्मात्यांनी चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मकतेवर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.

चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाने 3 दिवसात 88 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Web Title: Ram charan game changer team files complaint against 45 individuals piracy issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • KIARA ADVANI
  • Ramcharan
  • tollywood movie

संबंधित बातम्या

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’
1

करूरमधील घटनेमुळे लोकं संतापली, विजयचे रक्ताने माखलेले पोस्टर चर्चेत; ‘मारेकऱ्याला करा अटक…’

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई
2

OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई

साई पल्लवी-अनिरुद्ध रविचंदर कलईमामणी पुरस्कारांनी सन्मानित, तामिळनाडू सरकारने केली घोषणा
3

साई पल्लवी-अनिरुद्ध रविचंदर कलईमामणी पुरस्कारांनी सन्मानित, तामिळनाडू सरकारने केली घोषणा

साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमानच्या घरावर कस्टम्सचा छापा, काय आहे प्रकरण?
4

साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारन आणि दुलकर सलमानच्या घरावर कस्टम्सचा छापा, काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.