'मेला'मध्ये ऐश्वर्या राय साकारणार होती 'रूपा'ची भूमिका ; दिग्दर्शकाने २५ वर्षांनंतर केला खुलासा
अभिनेत्री ऐश्वर्या रायने हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्या म्हटलं की आजही तिचा ग्लॅमरस चेहरा समोर येतोच. तिने आपल्या अदाकारीने अवघ्या इंडस्ट्रीवर राज्य केले. ऐश्वर्याने १९९७ मध्ये, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यापूर्वी ऐश्वर्याचं मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध होतं. चित्रपटात येताच ती प्रसिद्धीझोतात आली. साऊथ चित्रपट ‘इरुवर’ मधून तिने पदार्पण केले आणि ‘प्यार हो गया या’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. जर, ‘राजा हिंदुस्तानीला’ तिने होकार दिला असता तर हा तिचा डेब्यू चित्रपट ठरला असता हे अनेकांना ठावूक नाही.
होय, १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’साठी ऐश्वर्या रायला पहिल्यांदा संपर्क करण्यात आला होता. इतकंच नाही तर ‘मेला’ चित्रपटासाठीही ऐश्वर्या रायला पहिल्यांदा संपर्क करण्यात आला होता. असा खुलासा दिग्दर्शक धर्मेश प्रधान यांनी केला. ‘मेला’ चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी यासंदर्भातील एक रंजक किस्सा शेअर केला आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत धर्मेश प्रधान यांनी सांगितले की, ‘राजा हिंदुस्तानी’ आणि ‘मेला’साठी माझी पहिली पसंती अभिनेत्री ऐश्वर्या राय होती, परंतु ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेमुळे ती हे चित्रपट करू शकली नाही. जेव्हा दिग्दर्शकाला विचारण्यात आले की ‘मेला’ची मूळ निवड ऐश्वर्या होती का ? तर त्या प्रश्नावर दिग्दर्शकांनी सांगितलं की, “हो, ऐश्वर्या त्या दोन्हीही चित्रपटांसाठी माझी मूळ निवड होती. १९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटामधील मेमसाबच्या भूमिकेसाठी माझी पहिली पसंती ऐश्वर्या होती.”
प्रेक्षकांच्या मनाला लायटिंग करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत, “मनाला लायटिंग” प्रेक्षकांच्या भेटीस!
ऐश्वर्या राय ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट का करू शकली नाही, याचं कारण सांगताना धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं की, “मला ती फार आवडत होती. या चित्रपटाच्या शुटिंगवेळी तिला ‘मिस वर्ल्ड’साठी जायचं होतं. त्यावेळी मला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता, कारण मला अशी अभिनेत्री हवी होती जी चित्रपट आणि बॉलिवूडला आपला सगळा वेळ देऊ शकेल. ही तिच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती की तिने ते आपल्या हृदयात ठेवले नाही.” धर्मेश प्रधानने ‘मेला’ चित्रपटातून कॅमिओ केल्याबद्दल ऐश्वर्या रायचे कौतुक केले. ते म्हणाले की, “शाहरुख आणि सलमानसारख्या स्टार्ससोबत काम करूनही तिच्यात अहंकार नाही. कॅमिओ सीनच्या शूटिंगसाठी तिने काही तास घालवले.” दिग्दर्शकाने असेही सांगितले की, “ऐश्वर्याऐवजी ट्विंकलला मुख्य भूमिकेत निवडल्यामुळे लोक मला विविध प्रकारचे प्रश्न विचारायचे. मी अनेक महिलांना भेटलो ज्यांनी मला सांगितले, ‘काय सर, तुम्ही ऐश्वर्याला कॅमिओ दिला आणि ट्विंकल खन्नाला एवढी मोठी भूमिका दिली.’ “