३ वर्षांच्या अफेअरनंतर बॉलिवूड अभिनेत्रीशी केलं ब्रेकअप, आता तिच्याच मैत्रिणीशी करीना- रणबीरच्या चुलत भावाने बांधली लग्नगाठ
करीना कपूर आणि रणबीर कपूरच्या आत्ये भावाने गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. त्याचं नाव आदर जैन असं असून आदरने फॅमिली आणि फ्रेंड्सच्या उपस्थितीत गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर या दोघांनी मोठ्या थाटात लग्नगाठ बांधली आहे. या भव्यदिव्य लग्नसोहळ्यात नीतू कपूरही उपस्थित होती. इतकेच नाही तर नीतू कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आदर आणि आलेखाचे फोटो शेअर करत या जोडप्याला अभिनंदन केले आहे.
‘मेला’मध्ये ऐश्वर्या राय साकारणार होती ‘रूपा’ची भूमिका ; दिग्दर्शकाने २५ वर्षांनंतर केला खुलासा
लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. ‘मिरा अक्स’ नावाच्या फॅन पेजने आदर आणि आलेखाच्या लग्नातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये आदर आणि आलेखा दोघेही लिपलॉक करताना दिसत आहे. एकमेकांना मिठी रोमँटिक पद्धतीने दोघेही एकमेकांना लाँग लिपलॉक करीत आहेत.
दोघांच्याही लूकबद्दल बोलायचे तर, लग्नामध्ये आधारने ग्रे कलरचा सूट घातला होता. ज्यामध्ये तो खूपच डॅशिंग दिसत होता. यासोबतच त्याची बायको म्हणजे आलेखा अडवाणी हिने व्हाईट कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग नेकलेस आणि कानातले घातले होते. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान, आदर आणि आलेखाने गोव्यामध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. त्यात हे कपल खूप रोमान्स करताना दिसत आहे. याशिवाय आदर आणि आलेखाच्या मित्रांनी काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आधार जैन आणि आलेखाच्या मित्रांनी गोव्यातील लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये, आधार आणि आलेखा एकत्र येत त्यांच्या खास दिवसाचा आनंद घेताना दिसत आहेत. दुसरीकडे, आधारची चुलत बहीण करिश्मा कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या जोडप्यासाठी खास एक पोस्ट शेअर केली आहे. कस्टमाइज्ड नारळाच्या पाण्याचा फोटो शेअर करताना करिष्माने लिहिले की, ‘सेलिब्रेटिंग अलेखा आणि आधार…’ आधार जैन आणि आलेखा अडवाणी यांचा रोका सोहळा नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या खास सोहळ्याला करीना कपूर, करिश्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांनीही हजेरी लावली होती. यादरम्यानही या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.