Animal (9)
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांची प्रमुख भूमिका असलेला अॅनिमल (Animal) सिनेमा 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ट्रेलरला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळल्यानंतर आता सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अॅनिमलने रिलीजआधीच अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई (Animal Advance Booking) केली आहे. सध्या चित्रपटाची टिमचं जोरात प्रमोशन सुरू आहे. एका इव्हेंट दरम्यान अभिनेता रणबीर कपूरनं चित्रपटाच्या नावावर एक खुलासा केला आहे.
[read_also content=”रणबीरच्या ‘ॲनिमल’ सिनेमाचं फॅन्समध्ये क्रेझ; रिलीजआधीच ॲडव्हान्स बुकिंगमधुन कोट्यवधींची कमाई! https://www.navarashtra.com/movies/animal-advance-booking-ticket-sold-for-1st-day-show-at-rs-1-25-lakh-nrps-484201.html”]
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅनिमलची संपूर्ण टीम वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत आहे. नुकतेच चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने चित्रपटाचे शीर्षक ‘अॅनिमल’ ठेवण्यामागचे कारण सांगितले आहे. रणबीर कपूर म्हणाला, मला वाटते की तुम्ही प्राणी हा चित्रपट मी साकारलेल्या या पात्राच्या आणि इतर पात्रांच्या दृष्टिकोनातून पाहत आहात ज्याबद्दल मी बोलू शकत नाही. एकदा चित्रपट बघितला की समजेल.
सिनेमाचं नाव अॅनिमल का ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर खरतरं सगळया प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, मला वाटते की संदीप रेड्डी वंगा या चित्रपटाला अॅनिमल म्हणण्याचे कारण म्हणजे प्राणी त्याच्या अंतःप्रेरणेच्या बाहेर वागतो. ते विचारपूर्वक वागत नाहीत. त्यामुळे मी साकारलेली ही व्यक्तिरेखा तो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सहजतेने वागतो. तो आपल्या कुटुंबासाठी काहीही करु शकतो. तो असा विचार करत नाही की तो सहजतेने वागत आहे, तो आवेगपूर्ण आहे आणि मला वाटते की त्यामुळे सिनेमाला अॅनिमल हे नाव देण्यात आले आहे. चित्रपट पाहिल्यावर हे नाव चित्रपटाला पुरक आहे हे लक्षात येईल.
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने१ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सने अॅनिमल चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल 6.4 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल दोन लाख तिकीट विकले गेले आहेत. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेतील तिकीट विकले गेले आहेत.