
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…
राधाच्या एलिमिनेशननंतर घरात उर्वरित 16 स्पर्धक आता राहिले आहेत. आणि आता अशातच आणखी एक मोठा ट्विस्ट ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळणार आहे. ज्याने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक सदस्यांची झोप उडणार आहे. अलिकडेच कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमुळे वाइल्ड कार्ड एन्ट्रीची होणार असल्याचे म्हटले आहे. आता हा वाइल्ड कार्ड सदस्य नक्की कोण आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
वाइल्ड कार्ड प्रोमोने उडवली खळबळ
‘बिग बॉस मराठी 6’च्या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्य लिव्हिंग रूममधील स्क्रीनसमोर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात बिग बॉस घोषणा करतात की, “आता येत आहेत बिग बॉस मराठी सीझन 6 चे पहिला वाइल्ड कार्ड सदस्य…” यानंतर घरातील फिरता दरवाजा उघडताना दाखवला आहे. दरवाजा उघडताच काही स्पर्धक टाळ्या वाजवताना, काही गोंधळलेले तर काही पूर्णपणे आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. मात्र, वाइल्ड कार्ड म्हणून नेमकं कोण येणार, हे सोमवारी प्रसारित होणाऱ्या भागातच स्पष्ट होणार आहे.
खरंच वाइल्ड कार्ड की बिग बॉसचा डाव?
हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या आवडत्या कंटेंट क्रिएटर्स आणि सेलिब्रिटींची नावे सुचवली आहेत. मात्र, खरंच वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार की बिग बॉस नेहमीप्रमाणे प्रेक्षकांसाठी एखादा ट्विस्ट प्लॅन करत आहेत, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आधीच्या पर्वांचा विचार केला, तर ‘बिग बॉस मराठी’मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री सहसा उशिरा झालेली पाहायला मिळते. मागील पर्वात बॉडीबिल्डर संग्राम चौगुले सहाव्या आठवड्यात वाइल्ड कार्ड म्हणून घरात दाखल झाला होता. त्याआधी अभिनेत्री स्नेहलता वसईकर पाचव्या आठवड्यात वाइल्ड कार्ड म्हणून आली होती. त्यामुळे यंदा तिसऱ्याच आठवड्यात वाइल्ड कार्ड येईल का, याबाबत प्रेक्षकांमध्ये साशंकता कायम आहे.