
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2026 मध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 131 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ज्येष्ठ टीव्ही आणि सिनेअभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावर आता प्रसिद्ध अभिनेते सुमीत राघवन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते याबद्दल नक्की काय म्हणाले जाणून घेऊयात.
सतीश शाह यांच्या या सन्मानाबद्दल मनोरंजनसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेतील त्यांचे सहकलाकार रत्ना पाठक आणि रूपाली गांगुली यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, या मालिकेत सतीश शाह यांच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत राघवन यांची प्रतिक्रिया भावनिक ठरली आहे.
सुमीत म्हणाला की, हा त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण होता, कारण सतीश शाह हे केवळ एक ज्येष्ठ कलाकारच नव्हे तर एक आदर्श कलाकार देखील होते. सुमीत म्हणाला, “ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, पण माझ्या मनात कुठेतरी मला प्रश्न पडतो की जेव्हा कलाकार आपल्यामध्ये असतो तेव्हा हे पुरस्कार त्यांना का दिले जात नाहीत? जर सतीश काका यांना स्वतः हा सन्मान स्विकारायला मिळाला असता, तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता.”
”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…
सुमीत पुढे म्हणाला, “25 ऑक्टोबर रोजी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हा सन्मान त्या जखमांवर मलम लावणारा आहे. आज ते कुठेही असले तरी नक्कीच हसत असतील. हा गौरव केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण ‘साराभाई’ कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही अभिमानास्पद आहे.” सतीश शाह यांचे 25 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनावेळी ते 74 वर्षांचे होते. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ZEE5 वरील ‘युनायटेड कच्छे’ या मालिकेत ते शेवटचे दिसले होते. यांच्या या अचानक जाण्याने त्यांचे चाहते दुःखी झाले आहेत.