ऋषी कपूर यांनी ज्याला टॅलेंटवरून हिणवलं होतं, आज तो बनला त्यांच्यापेक्षा मोठा स्टार...
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे, पण त्याचा सुप्रसिद्ध अभिनेता होण्याचा प्रवास खूप कष्टाचा होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याने स्वबळावर स्वत:चे स्थान प्रस्थापित केले आहे. पण एक काळ असा होता, तेव्हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी नवाझुद्दिनच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
नवाजुद्दिनने बॉलिवूडच्या रोमँटिक चित्रपटांबद्दल एक टिप्पणी केली होती, तेव्हापासून हा वाद सुरू झाला होता. नवाझुद्दिनने केलेली टिप्पणी ऋषी कपूर यांना खटकली होती. खरं तर, नवाझुद्दीन सिद्दीकीने रोमँटिक आणि रोमान्स असलेल्या बॉलिवूड चित्रपटांवर टीका केली होती. अभिनेता म्हणालेला की, काही कलाकार नेहमीच झाडांभोवती फिरत राहतात. त्याच प्रकारचा रोमान्स सध्या बॉलिवूडमध्ये दाखवताय. तो चित्रपटांना ‘क्लिच’ म्हणाला होता. वास्तविक जीवनात रोमान्स खूपच कठीण आणि मनोरंजक आहे, असं सुद्धा अभिनेता म्हणाला होता. ऋषी कपूर यांनी नवाझुद्दिनच्या विधानवर भाष्य केले.
‘रामायण’ मालिकेतील ‘राम-सीता’ पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत; वाचा सविस्तर
ऋषी कपूर ते त्यांच्या फिल्मी करियरच्या काळात रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध होते. ९० च्या काळात ‘रोमँटिक हिरो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी नवाजुद्दीनच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणालेले की, “रोमान्स करणे आणि गाणी गाणे सोपे नाही, परंतु ती एक कला देखील आहे.” ऋषी कपूर नवाजुद्दीनला सरासरी अभिनेता म्हणत ते पुढे म्हणाले की, “नवाझुद्दिनला रोमँटिक भूमिका साकारण्याची संधी मिळणार नाही आणि तो तशी भूमिका साकारण्यास सक्षमही नाही.”
ऋषी कपूर यांच्या या टिप्पणीवर नवाजुद्दीनने शांतपणे प्रतिक्रिया दिली होती. अभिनेता म्हणाला होता की, ” त्याचा अर्थ असा होता की, जेव्हा एखादा अभिनेता अनेक दशकांपासून एकाच प्रकारच्या भूमिका करतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या आणि सहजपणे अभिनय करतो. मी स्वतःला रोमँटिक भूमिकांपुरते मर्यादित ठेवू इच्छित नाही, परंतु जर त्याला अशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो ती वेगळ्या शैलीत स्वत:ला सादर करेल.” नवाझुद्दिन आणि ऋषी कपूर यांनी ‘मंटो और फॅमिली’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
दोन्हीही अभिनेत्यात झालेल्या वादानंतर नवाजुद्दीनने ऋषी कपूर यांच्या प्रती आदर कायम ठेवेल असे भाष्य केले होते. या शिवाय, मी ऋषी कपूर यांचा फार मोठा फॅन आहे, असं ही तो म्हणाला होता.