Marathi Actor Dr. Vilas Ujawane Death Marathi Celebrities Pay To Tribute
मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं शुक्रवारी (४ एप्रिल) दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्यावर बोरिवलीतल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज (शनिवार- ०५ एप्रिल) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकप्रिय मालिकांमध्ये नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेते विलास उजवणे यांचे निधन काही आजारामुळे झाले. त्यांच्या निधनावर काही मराठी सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर केली आहे.
‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर मराठी कलाकारांची प्रतिक्रिया, वाहिली श्रद्धांजली
लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने पोस्ट शेअर करत डॉ. विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता गौरव मोरेनेही इन्स्टा स्टोरी शेअर करत डॉ. विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो म्हणतो, “सर तुमची आठवण कायम राहिल, माझा पहिला प्रवास मी आपल्यासोबत केला होता. कायम तुमची आठवण येत राहिल सर…”, “अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ दिली. ही झुंज अखेर थांबल्याने कला विश्वातील एक अत्यंत दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…” अशी पोस्ट अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर मराठी कलाकारांची प्रतिक्रिया, वाहिली श्रद्धांजली
वादळवाट फेम ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डॉ. विलास उजवणे ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अंजली आणि मुलगा कपिल आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या सिने करियरमध्ये, अनेक मराठी नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या अभिनेता विलास उजवणे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ११० चित्रपट, १४० टेलिव्हिजन मालिका याशिवाय व्यावसायिक नाटकांचे त्यांनी साधारण ३ हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. याशिवाय उजवणेंनी ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘दामिनी’यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
अभिनय क्षेत्रात सुरुवातीच्या खडतर काळात मला अतिशय आपुलकीने मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे.
समोर आलेल्या आजारांचा त्यांनी अतिशय कणखरपणे सामना केला, या लढ्यात त्यांच्या पत्नी अंजली वहिनी यांनीही त्यांना खंबीर साथ… pic.twitter.com/oQNmv39LWF
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 4, 2025