स्प्लिट्सव्हिला फेम अभिनेत्यावर इतकी वाईट वेळ कशी आली ? भीक मागतानाचा व्हिडिओ व्हायरल
स्प्लिट्सव्हिलाच्या पाचव्या सीझनमधून घराघरांत पोहोचलेला सचिन शर्माबद्दल एक महत्वाची बातमी समोर येत आहे. सोशल मीडियावरील रिल्स आणि आपल्या फॅशनच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत राहणाऱ्या सचिनचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सचिन रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. त्याचा भीक मागतानाचा हा व्हिडिओ त्याने स्वत:च इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. सचिनवर इतकी वाईट वेळ कशी काय आली ? असा प्रश्न चाहते विचारताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये अभिनेत्याने या व्हिडिओमागील खरं कारण सांगितलं आहे.
टिव्ही अभिनेता सचिन शर्माने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. चिंतेत असलेला चेहरा, विस्कटलेले केसं आणि मळकटलेले कपडे अशा अवतरात सचिनला पाहून चाहते चिंतेत आले आहेत. सचिनला भिकारीच्या अवतारात पाहून चाहत्यांना ओळखुही येत नाहीये. भिकाऱ्याला पाहून रस्त्यावर ये- जा करणारी लोकं त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. इतकंच नाही तर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या सचिनला पोलिसही हटकवताना दिसतायत. सचिन लोकांनी कचऱ्यात फेकलेले पदार्थ खाताना दिसतोय. अभिनेत्याची अशी अवस्था पाहून त्याचे चिंतेत आले. पण हा व्हिडीओ शेअर करण्यामागचं कारण सचिनने सांगितलं आहे.
शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?
व्हिडिओ शेअर करताना सचिन म्हणतो की, “भिकारी निवडक नसतात. मला तो दिवस अजूनही आठवतो, ज्या दिवशी मी ही भूमिका करण्याचा निर्णय घेतला. एका भिकाऱ्याची भूमिका साकारणं ही गोष्ट माझ्यासाठी फार कठीण होतं. ज्यावेळी मी माझी हेअर स्टाईल केली, मेकअप केला त्यावेळी मला माझ्या स्वत:वर विश्वास बसला. ते लोकं जे प्रत्यक्षात रोज अनुभवतात, ते मी काल अनुभवलं आणि तोच माझा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता. कचऱ्यात फेकलेले पदार्थ भिकारी लोकं खाताना दिसतात. यापुढे पदार्थ कचऱ्यात फेकण्याआधी किंवा रस्त्यावर टाकण्याआधी या लोकांचा विचार करा”, असा संदेश सचिनने लोकांना दिला आहे. सचिनच्या या व्हिडीओचं आणि त्याच्या अभिनयाचं चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं आहे.
सचिन शर्माने शेअर केलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.