एकेकाळी वॉचमनची नोकरी करायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी करावा लागला १५ वर्षे संघर्ष
असा माणूस शोधूनही सापडणं अशक्य आहे, ज्याला बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याचं नाव माहिती नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नवाझुद्दिन सिद्दीकीचा आज ५१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याने आपल्या आजवरच्या सिनेकरियरमध्ये आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये, आपल्या वेगळ्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव प्रस्थापित करण्यासाठी या अभिनेत्याला फार मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात पसरले आहेत.
शेख हसिना यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी जन्म १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील ‘बुढाणा’या गावी झाला आहे. एका सामान्य मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या नवाझुद्दीनने आपल्या टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ला सिद्ध केलं आहे. १९९६ मध्ये नवाजुद्दिनने मुझफ्फरनगरमधील आपले घर सोडून दिल्ली गाठली. दिल्लीमध्ये अभिनेत्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर नवाझुद्दीनने मायानगरी आणि स्वप्ननगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांमधील छोट्या-छोट्या भूमिका मिळवण्यासाठी नवाजुद्दीनला त्याच्या फिल्मी करियरमध्ये फार संघर्ष करावा लागला. १९९९ मध्ये आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटामध्ये तो पहिल्यांदाच दिसला होता. या चित्रपटात नवाझुद्दीनने साईड रोल केला होता. या चित्रपटात अभिनेत्याचे केवळ काही मिनिटांचे पात्र होते.
‘बिग बॉस १८’ फेम अभिनेत्रीची अचानक बिघडली तब्येत, अवॉर्ड फंक्शन सोडून थेट गाठलं हॉस्पिटल
त्यानंतर नवाझुद्दीन सिद्दिकीने अनेक चित्रपटांमध्ये छोट- छोट्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले. पण तरीही अभिनेत्याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु, अभिनेत्याच्या नशीबामध्ये २०१२ हे वर्ष फार खास होतं. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग ऑफ वासेपूर’ चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्याच्या स्टारडम झपाट्याने वाढ झाली. या चित्रपटात नवाझुद्दीनने ‘फैजल खान’ची भूमिका साकारली होती, ज्याच्यावर त्याचे चाहते अजूनही प्रेम करतात. नवाज इंडस्ट्रीतल्या टॉप सेलिब्रिटींपैकी एक आहे. भूमिका कोणतीही असो, नवाज त्या भूमिकेला शंभर टक्के न्याय देतो. नवाजला ही किमया कशी साधता येते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक देशातच नाही तर, परदेशातही केले जाते. एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या जुन्या दिवसांवर त्याने भाष्य केले होते.
एका मुलाखतीमध्ये नवाझुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, “आम्ही ७ भाऊ, दोन बहिणी आणि आई- वडील असा आमचा परिवार आहे. माझे वडील शेतकरी होते. आमच्या बालपणी घरामध्ये चित्रपटाचे नाव काढणंही चांगले समजले नव्हते जात. आयुष्यच इतकं संघर्षमय होतं की, चित्रपटाबद्दल विचार करायला वेळच मिळत नव्हता. आमच्या आई- वडिलांना कायम वाटायचं माझे सर्व मुलं आणि मुली मोठ्यापणी चांगल्या नोकरीला लागावे, त्यांना शिक्षणात चांगल्या सुख-सुविधा मिळाव्यात अशी त्यांची इच्छा होती. ते कायमच आम्हाला प्रोत्साहित करायचे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर फॅक्टरीमधल्या जॉबसोबत वॉचमनचीही नोकरीही केली.”
Kartik Aaryan च्या आनंदाला नाही उरला पारावार, खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाला…
“अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत गुरुकुल कांगडी यूनिव्हर्सिटीमधून सायन्समध्ये त्याने ग्रॅज्यूएशन केले. तरीही नोकरी मिळाला नाही. त्यामुळे नाही नाही म्हणता दोन वर्षे भरकटत राहिलो. बडोदाची एक पेट्रोकेमिकल कंपनी होती, त्यामध्ये दीड वर्षे काम केले. ती नोकरी भयानक होती. अनेक प्रकारच्या केमिकल टेस्टिंग कराव्या लागात होत्या. यानंतर जॉब सोडला. दिल्लीला गेलो आणि नवीन नोकरी शोधू लागलो. वॉचमनची नोकरीही केली,” असं नवाज यांनी एका मुलाखतीत सांगितले. “एकदा मित्रासोबत नाटक पाहायला गेलो. ते पाहून फार आनंद मिळाला. तेव्हापासून मी नाटकं पाहायला सुरुवात केली. तेव्हापासूनच हळुहळू रंगमंच आवडायला लागला. असं नवाज यांनी एका मुलाखतीत सांगितले.
“मग स्वतःला म्हणालो, यार! हीच ती गोष्ट आहे, जी मला करायची आहे. काही काळानंतर एक ग्रुप जॉइन केला, तिथे साक्षी, सौरभ शुक्ला यांच्याशी ओळख झाली. तेव्हा नाटकांशी जोडलो गेलो. परंतू थिएटरमध्ये पैसे मिळत नव्हते. रोजचा खर्च भागवणे अवघड होत होते. संध्याकाळच्या जेवणाचा खर्च निघावा यासाठी वॉचमनची नोकरी करायला लागलो,” असे नवाजने सांगितले होते.