Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सहेला रे’… काही नात्यांना नाव नसतं, प्लॅनेट मराठीवरील नवीन चित्रपट १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस

'काही नात्यांना नाव नसतं', अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 26, 2022 | 12:33 PM
‘सहेला रे’… काही नात्यांना नाव नसतं, प्लॅनेट मराठीवरील नवीन चित्रपट १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस
Follow Us
Close
Follow Us:

‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने आतापर्यंत प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ‘ सहेला रे’चे पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय.

[read_also content=”पतियाळा हाऊस कोर्टाकडून जॅकलिनला दिलासा, मनी लाँड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर https://www.navarashtra.com/movies/patiala-house-court-grants-jacqueline-interim-bail-in-rs-200-crore-money-laundering-case-nrps-329833.html”]

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या बाजू असून लवकरच प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा चित्रपट पाहाता येणार आहे.”

दुबईमध्ये झालेल्या ‘एक्स्पो २०२० दुबई’ या सोहळ्यात ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच ५ वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही ‘सहेला रे’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच पसंती दर्शवतील. अक्षय बर्दापूरकर व ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत ‘सहेला रे’ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांचे आहेत.

Web Title: Sahela web movie streaming on plnanet marathi ott platform from 1 october nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2022 | 12:33 PM

Topics:  

  • subodh bhave

संबंधित बातम्या

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार
1

‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार

Priya Marathe : मालिकेच्या दरम्यान तिचा त्रास वाढला पण….; प्रिया मराठे बद्दल सुबोध भावेची भावूक पोस्ट
2

Priya Marathe : मालिकेच्या दरम्यान तिचा त्रास वाढला पण….; प्रिया मराठे बद्दल सुबोध भावेची भावूक पोस्ट

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध
3

पुन्हा एकदा 12 वर्षांनी तेजश्री प्रधानसाठी दिला सावनी रवींद्रने आवाज, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ऐकून चाहते मंत्रमुग्ध

शूटिंगदरम्यान आलेले दडपण, तेव्हा तेजश्रीने वाढवलेले धैर्य! ‘या’ अभिनेत्याने शेअर केला मालिकेतील अनुभव
4

शूटिंगदरम्यान आलेले दडपण, तेव्हा तेजश्रीने वाढवलेले धैर्य! ‘या’ अभिनेत्याने शेअर केला मालिकेतील अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.