Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Subodh Bhave: प्रभासच्या ‘फौजी’मधून सुबोध भावे करणार तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; सेटवरील अनुभव सांगत केलं सुपरस्टारचं कौतुक

Subodh Bhave: मराठी अभिनेता सुबोध भावे प्रभासच्या आगामी ‘फौजी’ चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. चित्रपटाच्या सेटवरील अनुभव सांगताना त्यांनी प्रभासच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावाचं कौतुक केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 01, 2026 | 03:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Subodh Bhave:  मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आजवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विविध भूमिका साकारत त्यांनी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सुबोध भावे आपल्या अभिनयाचा ठसा तेलुगू चित्रपटसृष्टीत उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटातून ते तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात काम करताना सुबोध यांना प्रभाससोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी ‘फौजी’च्या सेटवरील अनुभव सांगत प्रभासच्या साध्या आणि प्रेमळ स्वभावाचे भरभरून कौतुक केले. एवढा मोठा सुपरस्टार असूनही प्रभास सेटवर सर्वांशी अत्यंत आपुलकीने वागतो, असे सुबोध यांनी सांगितले.

‘एवढा मोठा सुपरस्टार असूनही प्रसिद्धीचा आव आणत नाही’

‘फौजी’ चित्रपटात सुबोध भावे हे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील अनुभव सांगताना त्यांनी प्रभासच्या साधेपणाचा विशेष उल्लेख केला. सुबोध म्हणाले, “‘फौजी’च्या सेटवर प्रभास इतका मोठा सुपरस्टार असूनही त्याने सर्वांशी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने वागणूक दिली. त्याचा स्वभाव खूपच मोकळा आणि सहज होता. त्याने सेटवरील इतर कलाकारांनाही अगदी सहज आणि आरामदायी वाटेल असे वातावरण निर्माण केले.”

पुढे त्यांनी अनुपम खेर यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले. “अनुपमजी (अनुपम खेर) देखील तिथे होते. मी अनुपमजी आणि प्रभास यांच्यासोबत एक सीन शूट केला. हा माझ्यासाठी विशेष अनुभव होता, कारण मला दोन मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रभास एक अप्रतिम व्यक्ती आहे. एवढा मोठा सुपरस्टार असूनही तो सेटवर आपल्या प्रसिद्धीचा किंवा मोठेपणाचा आव आणत नाही. आम्ही अतिशय सहज आणि आरामात शूटिंग केले,” असे सुबोध यांनी सांगितले.

Sanjay Gupta: दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या निधनानंतर लेकीचा VIDEO व्हायरल; पापाराझींना केले अश्लील हातवारे, नेटकऱ्यांचा संताप

प्रभासने इमानवीचा वाढदिवस केला खास

प्रभासचा सहकलाकारांप्रती असलेला जिव्हाळा अलीकडेही पाहायला मिळाला. त्याने आपली सहकलाकार इमानवी इस्माइल हिचा वाढदिवस खास करण्यासाठी घरीच बनवलेल्या विविध पदार्थांची मेजवानी आयोजित केली होती. यात बिर्याणी, कबाब, करी आणि डेझर्ट अशा पदार्थांचा समावेश होता.

इमानवीने सोशल मीडियावर या खास मेजवानीची झलक शेअर करत प्रभासचे आभार मानले. तिने लिहिले, “मन आणि पोट नेहमीच भरलेले राहील. धन्यवाद, प्रभास गारू.” तिच्या या पोस्टमुळे प्रभासच्या प्रेमळ आणि विचारशील स्वभावाची पुन्हा चर्चा सुरू झाली.

‘फौजी’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

प्रभास मुख्य भूमिकेत असलेल्या ‘फौजी’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि अनुपम खेर यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सुबोध भावे यांचा हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठीही ही विशेष बाब ठरणार आहे. आता या चित्रपटातून प्रभास आणि सुबोध भावे यांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

 

Web Title: Subodh bhave telugu debut prabhas fauji movie share set experience ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actor
  • subodh bhave

संबंधित बातम्या

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
1

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज
2

Pralhad Kudtarkar: ‘रात्रीस खेळ चाले’ फेम प्रल्हाद कुर्टडकर झाला बाबा! पत्नीचे आभार मानत चाहत्यांसोबत शेअर केली गुड न्यूज

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा नवा VIDEO चर्चेत; ‘तू पाठीमोरी गौरव मोरेसारखी दिसतेस’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Lalit Prabhakar: साधा पण आकर्षक अंदाज! ताज हॉटेलमध्ये ललित प्रभाकरचा स्टायलिश लूक पाहून चाहते फिदा
4

Lalit Prabhakar: साधा पण आकर्षक अंदाज! ताज हॉटेलमध्ये ललित प्रभाकरचा स्टायलिश लूक पाहून चाहते फिदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.