२०२४ वर्ष हे सई ताम्हणकर साठी खरंच खास आहे आणि याच कारण देखील तितकच वेगळं आहे ! काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सई ने तिच्या बॉलिवुड प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली होती आणि काल अमेझॉन प्राईम ने ” मटका किंग ” ची अधिकृत घोषणा करून सई देखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.
संपूर्ण जगाला ” सैराट ” करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या “मटका किंग” मध्ये सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
२०२४ हे वर्ष सई साठी बॉलिवुडमय ठरतंय यात शंका नाही. एकामागोमाग एक असे दमदार प्रोजेक्ट्स ती करणार आहे. ‘भक्षक’ या हिंदी वेब शो नंतर सई ने अग्नी, ग्राउंड झिरो आणि आता ‘मटका किंग’ अश्या उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये सई झळकणार आहे. ” मटका किंग” च शूटिंग काही दिवसापूर्वी सुरू झाले असून, विजय वर्मा आणि अनेक बॉलिवुड कलाकारांची मांदियाळी असलेल्या या शो मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे.
” मटका किंग ” बद्दलची घोषणा सगळ्याच प्रेक्षकांसाठी उत्साही बातमी तर आहेच पण सई यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सई आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे आणि म्हणून यातून काय सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
नागराज मंजुळे मंजुळे यांच्या सोबत काम करण्याबद्दल सई म्हणते “नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्ट मध्ये देखील होती आता आम्ही मटका किंग सारख्या प्रोजेक्ट साठी सोबत काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. अनेक इंटरव्ह्यू आणि सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती. आणि स्वप्नपूर्ती होते म्हणून एक वेगळं सुख आहे हे ! अमेझॉन प्राईम साठी हि वेब सीरिज आम्ही करतो आहोत आणि विजय वर्मा देखील त्याचा एक भाग आहे विजय सोबत सुद्धा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव या मुळे मिळणार आहे. तो एक उत्तम कलाकार आणि त्यांचा सोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक आहे. मटका किंग हा एक वेगळा अनुभव असणार आहे लवकरच या बद्दल अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. नागराज मंजुळे, विजय वर्मा आणि मटका किंग साठी मला खूप उत्सुकता आहे हे वेगळं थ्रील असणार यात शंकाच नाही” असे ती म्हणाली आहे.
[read_also content=”आदिनाथ कोठारे दिसणार हंसल मेहता यांच्या “गांधी” या वेब सीरिज मध्ये ! https://www.navarashtra.com/entertainment/adinath-kothare-will-appear-in-hansal-mehtas-gandhi-web-series-543515/”]
एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. बॉलिवुडला सईच्या अभिनयाची भुरळ पडली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही !