Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sairat Re- Re-released: ९ वर्षांनी ‘सैराट’ प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला, “‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला…”

'सैराट' चित्रपट बॉक्स ऑफिसवर री-रिलीज झाल्यानंतर अभिनेता आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 21, 2025 | 04:08 PM
९ वर्षांनी 'सैराट' प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला, “‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला…”

९ वर्षांनी 'सैराट' प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला, “‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला…”

Follow Us
Close
Follow Us:

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा सर्वाधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना विशेष भावला होता. अजय -अतुल यांच्या दमदार संगीतानेही चित्रपटाच्या लोकप्रियतेला हातभार लावला. संपूर्ण जगात चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली. या अभूतपूर्व यशानंतर ‘सैराट’आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर री- रिलीज झाला आहे. त्यामुळे आता ‘सैराट’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा आर्ची आणि परश्याच्या प्रेमकहाणीची जादू मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटेंची जोडी पुन्हा एकत्र, लवकरच प्रदर्शित होणार ‘गुलकंद’ चित्रपट

 

चित्रपट बॉक्स ऑफिसवर री-रिलीज झाल्यानंतर अभिनेता आकाश ठोसरने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आकाश म्हणतो, “सैराट!!! पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा ९ वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आलाय. आज ९ वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय याचा आम्हाला आज खरच खुप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर आर्ची- परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय आणि हे शक्य झाल ते फक्त नागराज आण्णामुळे! ‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आणि त्याबद्दल आम्ही आण्णांचा कायम ऋणी राहीन. आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत “सैराटमय” व्हायला विसरू नका !!!”

नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’, परीक्षकांची जबाबदारी कोण सांभाळणार

आकाश ठोसरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये चाहत्यांसोबत शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये आकाशसोबत रिंकूही पाहायला मिळत आहेत. दोघांचे वेगवेगळ्या सीन्स मधले हे फोटोज् आहेत. दरम्यान, आकाशने शुटिंग दरम्यानच्या शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव केला जात आहे. चाहत्यांकडून अवघ्या काही तासातच लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे. आकाशने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहते म्हणतात की, ‘महाराष्ट्रातील नंबर १ फेमस चित्रपट’, ‘मी पुन्हा एकदा ‘सैराट’चित्रपट पाहण्यासाठी तयार आहे’, ‘सैराट २ काढा की…’, ‘चित्रपट पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासारखी नाही’, ‘तुमचा अभिनय आणि तुमच्या साधेपणामुळेच असा पिक्चर परत कधीच होऊ शकत नाही.’, ‘जबरदस्त चित्रपट’, ‘कायमच फेव्हरेट चित्रपट अन् कपलही…’ अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया चाहत्यांनी आकाशच्या पोस्टवर केल्या आहेत.

Web Title: Sairat re released in theatre after 9 years akash thosar shared post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • marathi film
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’चा टिझर प्रदर्शित
4

थोडं प्रेम, थोडा गोंधळ आणि सोबतीला सस्पेन्सचा तडका, ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’चा टिझर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.