Saiyaara: दिग्दर्शक मोहित सूरी (Mohit Suri) यांचा ‘सैयारा’ (Saiyaara) हा चित्रपट १८ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून अहान पांडे आणि अनीत पड्डा ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता थिएटरनंतर १२ सप्टेंबर रोजी या चित्रपटाला ओटीटीवर रिलीज करण्यात आले असून, येथेही त्याने एक नवा इतिहास रचला आहे.
‘सैयारा’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या अवघ्या ५ दिवसांतच या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ‘सैयारा’ हा नॉन-इंग्लिश कॅटेगरीमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट बनला आहे. त्याने जर्मन चित्रपट ‘फॉल फॉर मी’लाही मागे टाकले आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सच्या टॉप १० ग्लोबल लिस्टमध्ये नंबर १ वर कायम आहे.
Global Top 10 Non-English Films on Netflix between 8 – 14 September
1. #Saiyaara 🇮🇳
2. #FallForMe 🇩🇪
3. #InspectorZende 🇮🇳
4. #LoveUntangled 🇰🇷
5. #Yadang: The Snitch 🇰🇷
6. #KontrabidaAcademy 🇵🇭
7. #AbandonedMan 🇹🇷
8. #Brick 🇩🇪
9. #Kingdom 🇮🇳
10. #KO 🇫🇷 pic.twitter.com/m8lzPMqw6t— Cinemania World (@Cinemania_World) September 16, 2025
रिपोर्ट्सनुसार, ‘सैयारा’ला एका आठवड्यात ३.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या यादीत मनोज बाजपेयी, विजय देवरकोंडा, जॉन अब्राहम आणि काजोल यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांच्या चित्रपटांनाही ‘सैयारा’ने मागे टाकले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने Jolly LLB 3 वरील बंदीची मागणी फेटाळली; म्हणाले- “आमची तर थट्टा….”
भारतातील नेटफ्लिक्सच्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत “सैयारा” पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ‘इन्स्पेक्टर झंडे’, तिसऱ्या क्रमांकावर ‘किंगडम एम्पायर’, चौथ्या क्रमांकावर ‘मेट्रो दिस डेज’, पाचव्या क्रमांकावर ‘मॉरिसन’, सहाव्या क्रमांकावर ‘तेहरान’, सातव्या क्रमांकावर ‘कराटे किड लेजेंड’, आठव्या क्रमांकावर काजोलचा ‘मॉम’, नवव्या क्रमांकावर ‘मटेरियलिस्ट्स’ आणि दहाव्या क्रमांकावर ‘के-पॉप डेमन हंटर्स’ यांचा समावेश आहे.
दरम्यान, बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, ‘सैयारा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने भारतात ३९८.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे, तर जगभरात ५६९.७५ कोटींची कमाई केली आहे.