फोटो सौजन्य - JIO Cinema सोशल मीडिया
बिग बॉस १८ : बिग बॉस मराठी सध्या प्रचंड चर्चेत आहे, या शोला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. आता बिग बॉस सिझन १८ ची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड सुरु आहे. बिग बॉस हिंदी हा शो प्रेक्षक आवडीने पाहता या शोचे कट्टर चाहते आहेत, त्याचबरोबर बिग बॉस आणि सलमान खान यांचं फार जुनं नातं आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त टीव्ही शो लवकरच परत येणार आहे. लोकांमध्ये ‘बिग बॉस’ १८ ची प्रचंड क्रेझ आहे. एकामागून एक स्पर्धकांची नावे समोर येत असतानाच आता एक नवा प्रोमोही रिलीज झाला आहे. मागील प्रोमोमध्ये, जिथे लोकांना फक्त लोगो पाहायला मिळाला होता, नवीन प्रोमोमध्ये आणखी काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
या शोमध्ये सलमान खान होस्ट म्हणून दिसणार आहे आणि यावेळी आम्हाला बिग बॉस स्पर्धकांचे भविष्य पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा सीझन आणखी रोमांचक होणार आहे. प्रोमो शेअर करताना कलर्स टीव्हीने कॅप्शनमध्ये लिहिले – यावेळी घरात भूकंप येईल, कारण बिग बॉसमध्ये टाइम क्रंच असेल. टाइम का तांडव या थीमसह बिग बॉस स्पर्धकांचे वर्तमानच नव्हे तर त्यांचे भविष्यही पाहू शकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सलमान खानचा शो बिग बॉस दरवर्षी नवीन काही तरी प्रेक्षकांसाठी आणत असतो. शोच्या थीमची आणि त्यात काय नवे घडणार आहे यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, ‘हा डोळा दिसायचा तसेच दाखवायचा, पण फक्त आजची परिस्थिती. आता असा डोळा उघडेल जो इतिहासाचा क्षण लिहील आणि भविष्य दिसेल. या सीझनमध्ये, बिग बॉसच्या मदतीने घरातील सदस्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. यासोबतच शो सुरू होण्याची अधिकृत तारीखही समोर आली आहे. तुम्ही कलर्स टीव्हीवर ६ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता पाहू शकाल.