Sikandar Official Trailer: 'सिकंदर'चा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज, भाईजानने ३ मिनिटे ३७ सेकंदात सर्वांचेच मन जिंकले...
अखेर भाईजानचे चाहते ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला. काही वेळापूर्वीच ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित (Director A.R. Murugadoss) ‘सिकंदर’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची आता चित्रपटाबद्दलची एक्सायटमेंट आणखीन वाढली आहे. चित्रपटातील दोन गाणी आणि टीझरनंतर अखेर चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘सिकंदर’ चित्रपट रिलीज होणार आहे.
अश्लील मेसेजेस, जिवंत जाळण्याची धमकी; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! FIR दाखल
येत्या ३० मार्चला ‘सिकंदर’ चित्रपट देशासह जगभरात रिलीज होणार आहे. काही वेळापूर्वीच निर्मात्यांच्या युट्यूब अकाऊंटवर अखेर ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ‘नाडियाडवाला ग्रँडसन’च्या युट्यूब अकाऊंटवर भाईजानच्या चाहत्यांना ट्रेलर पाहायला मिळेल. प्रेक्षकांनी अपेक्षा बाळगल्यानुसार ‘सिकंदर’चा ट्रेलर खरोखरंच मनोरंजक आहे. भाईजानच्या डायलॉगने, अफलातून ॲक्शनने, जबरदस्त स्टंट्सने आणि सडोतोड डायलॉग्जने ट्रेलरला चार चाँद लावले आहेत. सलमानच्या दमदार स्टाईलवर पुन्हा एकदा चाहते भाळले आहेत. भाईजानने आपल्या चाहत्यांना ‘सिकंदर’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना पूर्णपणे खूष करण्यात यशस्वी झालाय.
दरम्यान, पहिल्यांदाच सलमान खानबरोबर टॉलिवूड अभिनेत्री असणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदान्नाची जोडी दिसणार असून त्यांची केमिस्ट्री नेटकऱ्यांना प्रचंड भावलेली पाहायला मिळत आहे. यावेळी सलमानच्या चित्रपटात व्हिलन कोणी बॉलिवूडमधील कलाकार नाहीये, तर थेट ‘बाहुबली’तला ‘कट्टप्पा’ आहे. त्यामुळे दोघांच्यात रंगणारा पडद्यावरचा मुकाबला रंगतदार होणार आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमान खान ‘भाईजान’ नाहीतर ‘राजा साब’ म्हणून मनोरंजन करणार आहे. अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात राजा साब लढताना दिसेल. यावेळी सामान्य जनतेचा आवाज होऊन सलमान खान ‘सिकंदर’मध्ये गर्जना करणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच, सलमानला एका तरुण अभिनेत्रीसोबत काम केल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला होता. पण ट्रेलरवरून असे दिसते की चित्रपटातील रश्मिकासोबतची त्याची केमिस्ट्री चाहत्यांना आवडू शकते.
रीना दत्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानची झालेली ‘अशी’अवस्था; म्हणाला, ‘एका दिवसात एक बाटली…’
दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आमिर खानचा ‘गजनी’ चित्रपट बनवणारे दिग्दर्शक ए.आर.मुरुगदॉस आता सलमान खानची कारकीर्द आणखी चांगली करण्यासाठी सज्ज झाले आहेत. सलमान खानचा हा चित्रपट १००० कोटी क्लबमध्ये सामील होईल, अशी नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.