actress angel rai got obscene messages and threat to burn alive actress filed
सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि अभिनेत्री एंजल राय सध्या चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, त्याशिवाय तिला त्याने अश्लील मेसेजही पाठवले आहेत. मुंबईतल्या गोरेगावमधील बांगुर नगरमध्ये राहणाऱ्या एंजलला गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे.
रीना दत्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानची झालेली ‘अशी’अवस्था; म्हणाला, ‘एका दिवसात एक बाटली…’
सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांना वैतागून एंजलने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून याप्रकरणी अभिनेत्रीने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध FIR नोंदवला आहे.सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि अभिनेत्री एंजल रायने गोरेगावच्या बांगुरनगर पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात अश्लील मेसेज पाठवल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीच्या जबाबावरून गोरेगावच्या बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवनीत कौरला वयाच्या ११व्या वर्षी दिग्दर्शकाने सेटवर केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली…
एंजल राय दाखल केलेल्या तक्रारीत म्हणते की, गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेजेस आणि जीवे मारण्याची धमकी देणारे ईमेल पाठवत आहे. इतकंच नव्हे तर तो व्यक्ती तिला जिवंत जाळण्याची आणि शरीराचे तुकडे- तुकडे करण्याची धमकी देत आहे. अभिनेत्रीला यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. पण जेव्हापासून अभिनेत्रीच्या ‘घोटाला’या अपकमिंग वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच तिला अज्ञात व्यक्तीकडून येणाऱ्या धमक्यांचं प्रमाण वाढलं आहे.
अमाल मलिकने कुटुंबाशी संबंध तोडल्यानंतर वडिलांनी २ दिवसांनी सोडले मौन, फक्त ३ शब्दात दिले उत्तर!
वारंवार अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेजेस आणि जीवे मारण्याची धमकी देणारे ईमेल येत असल्याने अभिनेत्रीने घाबरुन पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी आणखी तपास करण्यात येणार आहे. पोलिसांनी अभिनेत्रीला धमक्या देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत ७५, ७८, ७९, ३५१(३), ३५२, ३५६(२) आणि माहिती तंत्रज्ञानच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री एंजल रायचे सोशल मीडियावर २५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिची आगामी वेबसीरिज घोटाला २९ मार्चला रिलीज होणार आहे. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी, अशी अभिनेत्रीला आशा आहे.