(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
समय रैनाचे नाव मेंटलिस्ट सुहानी शाह आणि बुद्धिबळपटू तानिया सचदेव यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींशी जोडले गेले होते. मात्र, आता त्याने स्वतःच आपल्या ‘गर्लफ्रेंडची’ जगाशी ओळख करून दिली आहे. नेमकं घडलं असं की, इन्स्टाग्रामवरील एका Q&A सत्रादरम्यान, युजर्सनी समयला त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करण्यास सांगितलं. कोणताही संकोच न करता, समयने एक सेल्फी पोस्ट केला. त्याने पोस्ट केलेला फोटो पाहता चाहत्यांना धक्का बसला. नेमका कोणाचा फोटो होता.

समय रैनाने बलराज सिंग घई यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. बलराज हे समयचे जवळचे मित्र असून, मुंबईतील ‘हॅबिटॅट कॉमेडी क्लब’चे मालक आहेत. बलराजसोबतचा फोटो शेअर करून समयने हे स्पष्ट केले की, तूर्तास तरी तो आपल्या सर्वात जवळच्या मित्रासोबतच एका ‘रिलेशनशिप’मध्ये आहे.
जेव्हा समय रैनाने ‘Still Alive’ या व्हिडिओद्वारे पुनरागमन केलं, तेव्हा त्याने याचे श्रेय आपला मित्र बलराज याला दिले. समय म्हणाला, “आज मी जिवंत आहे, ते केवळ बलराजमुळेच. तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे.” त्याने हे देखील उघड केले की, ‘India’s Got Latent’ या एपिसोडवरून निर्माण झालेल्या वादंगानंतर, बलराजच्या पत्नीने त्याला एक व्हिडिओ पाठवला होता. ‘हॅबिटॅट क्लब’च्या आत चित्रित केलेल्या त्या व्हिडिओमध्ये, बलराजचे वृद्ध आई-वडील तरुण पोलीस अधिकाऱ्यांच्या पाया पडताना आणि त्यांची विनवणी करताना दिसत होते. ते वृद्ध जोडपे अधिकाऱ्यांकडे आपल्याला सोडून देण्याची याचना करत होते आणि आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा आग्रह धरत होते. या घटनेचे वर्णन करताना समय रैना अत्यंत भावूक झाला होता.
आपल्या पुनरागमनासोबतच, समयने हे देखील सांगितले की, ‘India’s Got Latent’ वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. मात्र, त्याचे आई-वडील आणि मित्रांनी त्याला पुन्हा खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रेरित केले. इन्स्टाग्रामवरील त्या प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान, समयने अशीही एक झलक दिली की, तो लवकरच रणवीर अलाहाबादियासोबत एखादा collaboration करणार आहे. समय आणि रणवीर यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत.






