संजय दत्तच्या प्रेमापोटी चाहतीने थेट अभिनेत्याच्या नावावरच केले ७२ कोटी! वकिलाने सांगितले थक्क करणारे कारण
आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काहीही करु शकतात, याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा आलेला आहे. आवडत्या कलाकाराला भेटता यावं आणि त्याच्यासोबत एक फोटो घेता यावा, यासाठी ते मोठी धडपड करतानाही दिसतात. अनेक चाहते तर आपल्या आवडत्या कलाकाराला प्रेमापोटी महागड्या भेटवस्तूसुद्धाही गिफ्ट म्हणून देतात. तर काही चाहते आपल्या आवडत्या कलाकारावर इतकं प्रेम दाखवतात की, त्यांचं प्रेम पाहून अनेक जण चकित होतात. असंच काहीसं बॉलीवूड अभिनेता संजय दत्तबरोबरही घडलं होतं.
सलमान खानने ‘तेव्हा’ जवळून पाहिलेला मृत्यू; म्हणाला, “४५ मिनिटं विमानाच्या इंजिनाचा…”
एका महिला चाहतीने तिची मालमत्ता थेट बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या नावावरच करुन टाकली होती. ही घटना २०१८ मधली आहे. २०१८ साली अभिनेत्याला पोलिसांचा फोन आला होता. पोलिसांनी अभिनेत्याला त्याची कट्टर चाहती असलेल्या निशा पाटील हिच्याबद्दल सांगितले. जिने आपल्या मृत्यूपूर्वी तिची सर्व मालमत्ता संजयच्या नावावर केल्याचे त्यांनी सांगितले. निशाच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अभिनेत्याला हा फोन केला होता. जेव्हा पोलिसांनी त्याला कळवले की त्याच्या महिला चाहतीने त्याच्यासाठी सुमारे ७२ कोटी रुपयांची मालमत्ता सोडली आहे, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
मीडिया रिपोर्टनुसार, निशाने बँकांना अनेक पत्रे लिहून अधिकाऱ्यांना तिची संपूर्ण मालमत्ता तिच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्याला सोपवण्याची विनंती केली होती. या घटनेने संजयलाही धक्का बसला. अभिनेत्याच्या वकिलानेही सांगितले की, अभिनेता या घटनेवर काहीही करु शकत नाही, शिवाय अभिनेत्रीने दिलेल्या ७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवरही तो दावा करणार नाही. वकीलांनी सांगितले की, संजय त्या चाहतीला कधीच ओळखत नसल्यामुळे त्या पैशांवर तो कोणताही दावा करणार नाही. दरम्यान, संजयनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणात तो निशाला ओळखत नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे तो काहीही दावा करणार नाही. संजय म्हणाला होता की ‘मी चाहतीच्या मालमत्तेवर कोणताही दावा करणार नाही. मी निशाला ओळखत नव्हतो.
दरम्यान, संजयच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, तो सुमारे २९५ कोटी रुपयांचा मालक आहे. तर तो एका चित्रपटासाठी ८ ते १५ कोटी रुपयां इतके मानधन घेतो. तो ZimAfro T10 आणि B-Love Kandy सारख्या क्रिकेट संघांचा सह-मालक देखील आहे. याशिवाय संजयचे दोन प्रॉडक्शन हाऊस होते. त्याने स्नीकर मार्केटप्लेसपासून ते स्वतःच्या स्कॉच व्हिस्की ब्रँड The Glenwalk विविध स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईत त्यांचे ४० कोटी रुपयांचे घर आहे. दुबईमध्ये त्याचे एक आलिशान घर देखील आहे. या अभिनेत्याकडे काही सर्वात महागड्या बाईक आणि कार देखील आहेत.