Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या कारणामुळे शाहरुख खान सोडणार होता बॉलिवूड ? स्वत:च्याच चुका सांगत केला खुलासा

अलीकडेच किंग खानने एका कार्यक्रमात त्याच्या आयुष्यातली एक जुनी आठवण सांगितली. एके काळी तो बॉलिवूड सोडून चालला होता, असं त्याने सांगितले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 23, 2024 | 07:45 AM
पद्मश्री ते डॉक्टरेट... ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख खानला किती पुरस्कार मिळाले

पद्मश्री ते डॉक्टरेट... ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख खानला किती पुरस्कार मिळाले

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या साडे तीन दशकांपासून शाहरूख खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दरम्यान, किंग खानने आजवर १०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. किंग खानने खरंतर स्वत:च्या नावावर एक अनोखा विक्रमही तयार केला आहे. तो सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत अव्वल आला असून जागतिक स्तरावर सर्वाधिक फॅन्स असणाऱ्या सेलिब्रिटींमध्येही त्याचा समावेश आहे. अलीकडेच किंग खानने एका कार्यक्रमात त्याच्या आयुष्यातली एक जुनी आठवण सांगितली. एके काळी तो बॉलिवूड सोडून चालला होता, असं त्याने सांगितले आहे.

श्रेया बुगडेचा मोरपंखी रंगाच्या साडीतला ग्लॅमरस लुक पाहिला का?

अलीकडेच शाहरूख खानने दुबईमध्ये झालेल्या तिसऱ्या ग्लोबल फ्रेट समिटमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. तुझ्या प्रोफेशनमधली अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आश्चर्यचकित करते ? या प्रश्नाचं उत्तर सांगताना अभिनेता म्हणाला, “मला दररोज झोपेतून उठल्यावर अजूनही खूप काही शिकण्यासारखं आहे, याची जाणीव झाल्यावर मला आश्चर्य वाटते. जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाच्या सेटवर आलो तेव्हा मला वाटले की मी सर्वोत्तम अभिनेता आहे. मला स्वत:वर अतिआत्मविश्वास होता. ज्यावेळी मला जाणवलं की, सेटवर प्रत्येकजण माझ्यापेक्षा चांगला अभिनय करत होते.”

“आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

स्वत:चा किस्सा सांगताना अभिनेत्याने पुढे सांगितले की, “त्यामुळे मी पुन्हा दिल्लीला जायचा निर्णय घेतला होता. मला माझ्या घरी दिल्लीला जायचं होतं कारण मला समजले होतं की मी खूप वाईट अभिनेता आहे. त्यामुळे मी विमानतळावर धाव घेतली, तिकीट घेतले आणि मुंबईहून दिल्लीला जाणार पहिल विमान पकडलं. मला आताही आठवतंय की, तेव्हा एक आंतरराष्ट्रीय फ्लाइट होती जी २५ टक्के स्वस्त असायची कारण मला दुसऱ्या विमानाचे तिकीटं परवडणारी नव्हती. मी जेव्हा माझ्या जुन्या व्हिडिओ पाहतो, तेव्हा मी माझ्यात खूप चुका काढतो. तेव्हा मी खूप चुकीचा दिसायचो. जर तुम्ही समाजात व्यवस्थित वावरलाच नसाल, तेव्हा तुम्हाला वाटतं की मी खूप चांगला आहे.”

‘याला म्हणतात संस्कार…’ गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांची कमेंट; अभिनेत्याचं होतंय कौतुक

“पण जेव्हा तुम्ही समाजात वावरायला सुरूवात करता तेव्हा तुम्हाला तुमच्यातल्या चुका कळतं. प्रत्येक वेळी मी काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. तेव्हा मला माझ्यातल्या चुका कळतात आणि तेव्हा मला कळतं की मी चांगला व्यक्ती नाही. हिच गोष्ट मला अभिनयाच्याबाबतही सतावतेय. बऱ्याचदा मी माझे जुने चित्रपट पाहतो, त्यावेळी मी विचार करतो की, मी ही गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने करू शकलो असतो. माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत, प्रत्येक वेळी सेटवर जातो तेव्हा मला जाणवते की अजून जे मला माहिती नाही अशा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे मला माझ्या व्यवसायाबद्दल आश्चर्यचकित करते.”

Web Title: Shah rukh khan wanted to quit bollywood took flight to delhi realised not the best actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!
1

71st National Film Award: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला किती मिळते रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क!

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास
2

फक्त अभिनय नव्हे तर अभ्यासातही होता बादशाह! शाहरुखने केली होती ‘ही कठीण परीक्षा पास

Shah Rukh Khan On Punjab Flood: पंजाबमध्ये पुराचा कहर, शाहरुख खानची भावनिक प्रतिक्रिया; ‘पंजाबचे धैर्य कधीही तुटणार नाही…’
3

Shah Rukh Khan On Punjab Flood: पंजाबमध्ये पुराचा कहर, शाहरुख खानची भावनिक प्रतिक्रिया; ‘पंजाबचे धैर्य कधीही तुटणार नाही…’

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
4

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.