Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

King Movie: ‘दीपिका पदुकोण केवळ एक प्यादी…’; शाहरुख खानच्या ‘किंग’वरून वादाची ठिणगी, भगव्या ड्रेसवर भाजप आमदारांचा आक्षेप

King Movie Controversy: शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाये’ गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या ड्रेसवर भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी आक्षेप घेतला आहे. दृश्य न हटवल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 06, 2026 | 09:00 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

King Movie Controversy: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चर्चा रंगू लागली आहे. मात्र, यावेळी चित्रपटाच्या कथेमुळे किंवा कलाकारांमुळे नव्हे, तर एका गाण्यातील दीपिका पदुकोणच्या पोशाखामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘तू मिल जाये’ या गाण्यात दीपिका भगव्या रंगाचा पोशाख परिधान करून दिसत आहे. तिच्या या लूकवर दिल्लीतील पटपडगंज मतदारसंघाचे भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी आक्षेप घेतला आहे. इतकेच नाही, तर त्यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप करत गाण्यातील दृश्य न बदलल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

दीपिकाच्या भगव्या ड्रेसवर भाजप आमदारांचा आक्षेप

शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाये’ या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाचा पोशाख परिधान करून नृत्य करताना दिसते. याच दृश्यावरून भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘डेली न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा प्रकार सनातन धर्माला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला.

यावेळी त्यांनी शाहरुख खानवरही निशाणा साधला. “हा त्यांचा स्वभाव आहे, कारण हा शाहरुख खानचा चित्रपट आहे. शाहरुख खान आणि देशातील हे सर्व जिहादी देशातून पैसे कमावतात आणि देशाची बदनामी करतात. त्यांना भगव्या रंगाचा प्रॉब्लेम आहे आणि दीपिका पदुकोण केवळ एक प्यादी आहे. हे जिहादी त्यांच्या मागे आहेत. मी शाहरुख खानला जिहादीच म्हणेन,” असे वादग्रस्त विधान रवींद्र सिंग नेगी यांनी केले.

गाण्यातील दृश्य न हटवल्यास देशभर आंदोलनाचा इशारा

रवींद्र सिंग नेगी यांनी शाहरुख खानला थेट इशारा दिला आहे. ‘तू मिल जाये’ या गाण्यातील दीपिकाचा पोशाख आणि नृत्याची पद्धत सनातन धर्माला शोभणारी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गाण्यातील संबंधित दृश्य बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

“आम्ही शाहरुख खानला इशारा देतो की, जर हे दृश्य बदलले नाही, तर देशभरात आंदोलने होतील. सनातन धर्माच्या विरोधात काहीही सहन केले जाणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे ‘किंग’ चित्रपटाभोवतीचा वाद आणखी चर्चेत आला आहे.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

 

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?

‘पठाण’ चित्रपटाच्या वादाची पुन्हा आठवण

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तुलना शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाशी केली जात आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या पोशाखावरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदू संघटनांनी या गाण्याला विरोध करत आंदोलन केले होते.

आता पुन्हा एकदा शाहरुख खानच्या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या पोशाखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘किंग’ चित्रपटातील हे दृश्य बदलले जाणार का आणि या प्रकरणावर शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!

Web Title: King movie controversy shah rukh khan deepika padukone saffron dress ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • Deepika Padukone
  • entertainment
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?
1

Ramayana Box Office Collection: रणबीरच्या ‘रामायण’ची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग; पहिल्याच दिवशी मोडले ‘धुरंधर’,‘पठाण’चे रेकॉर्ड?

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता
2

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद
3

Miss Universe 2026: मिस युनिव्हर्स २०२६ मध्ये भारत-पाकिस्तानची टक्कर! काजिया लिझला आव्हान देणार पाकिस्तानची मिस्बाह अरशद

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
4

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.