फोटो सौजन्य - Social Media
बी टाऊनचा किंग म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता शाहरुख खान त्याच्या सिनेमांनी जगभरात डंका वाजवत असतो. त्याचे सिनेमा भारतातच नव्हे तर साता समुद्रापार गाजतात आणि मोठ्या संख्येने पाहिले जातात. शाहरुखचे चाहते जगभरात पसरले आहेत. त्याची ही लोकप्रियता आहे ती त्याच्या अभिनयामुळे! शाहरुख अभिनयात इतका उत्कृष्ट आहे की एका मध्यमवर्गीय घरातून येणारा मुलगा आज अभिनय क्षेत्रावर राज्य करतोय, ही फार मोठी बाब आहे. सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे शाहरुख फक्त अभिनयात नव्हे तर शिक्षणातही पुढारलेलाच होता.
दरम्यान, शाहरुखची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या शिक्षण प्रवासाबद्द्दल सांगितले आहे. तो म्हणतो की,” मी शाळेत असताना विज्ञान विषय अभ्यासात होतो. माझ्या आईची इच्छा होती की मी IIT प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी आणि ती मी करून दाखवली. यांनतर माझ्या आईचे स्वप्न होते की मी इकॉनॉमिक्स विषयात शिक्षण घ्यावे.”
शाहरुखचे शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये झाले. त्यांनतर त्याने जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशन पूर्ण केले. मुळात, या मुलाखतीत शाहरुख म्हणाला की त्याच्या घरी त्याच्या विचारांना जागा होती. आपले विचार मांडण्याचा हक्क होता. दोघे भाऊ बहिणींना कधीच हेच कर आणि तेच कर, अशी जोरजबरदस्ती करण्यात आली नाही.
शाहरुखला त्याच्या पालकांनी ज्या प्रकारे वाढवले तसेच त्याला त्याच्या मुलांना वाढवायचे अशी इच्छा होती. त्याचे असे म्हणणे आहे की, “पालकांच्या सांगण्यात जबरदस्ती नसावी तसेच भीती नसावी पण आदर असावा…” दरम्यान, शाहरुख पठाण, जवान आणि डंकी सिनेमात दिसून आला होता. शाहरुख त्याच्या लेकीसोबत लवकरच एका सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा पाहण्यास शाहरुख खानचे चाहते फार उत्सुक आहात.