फोटो सौजन्य - Social Media
ग्रॅज्युएट, टेक्निशियन किंवा ट्रेड फील्डमध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करून करिअरची नवी दिशा शोधत असाल, तर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) तर्फे तुम्हाला सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ही कंपनी भारत सरकारची नवरत्न सार्वजनिक उपक्रम असून, देशातील नामांकित रसायन आणि खत उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीतर्फे विविध ट्रेड्समध्ये अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अप्रेंटिसशिपद्वारे उमेदवारांना केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष औद्योगिक कामकाजाचा अनुभव देखील मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील करिअरच्या संधी अधिक बळकट करण्यास ही संधी उपयुक्त ठरणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोंदविणे आवश्यक आहे.
या भरती मोहिमेत एकूण 325 जागा उपलब्ध असून, त्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 115 जागा, टेक्निशियन अप्रेंटिससाठी 114 जागा आणि ट्रेड अप्रेंटिससाठी 96 जागा समाविष्ट आहेत. या प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांना उद्योगातील व्यावहारिक कामाची जाण मिळेल, प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल तसेच तज्ञ व्यक्तींशी संवाद साधून कौशल्य वाढविण्याची संधी मिळेल. अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात, कारण अशा प्रकारच्या औद्योगिक प्रशिक्षणाला रोजगारदात्यांकडून अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ज्यांना आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करायची आहे, त्यांच्यासाठी ही अप्रेंटिसशिप एक उत्तम टप्पा ठरू शकतो.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम, बीबीए किंवा कोणत्याही शाखेत पदवीधर असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी बीएस्सी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रतेबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
महत्वाची सूचना
अधिक माहितीसाठी आणि कोणत्याही अद्यतनांसाठी उमेदवारांनी नियमितपणे RCFL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.