Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोड ट्रीपमध्ये अनुभवयाला मिळणार नात्याची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती... वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 04, 2024 | 04:29 PM
रोड ट्रीपमध्ये अनुभवयाला मिळणार नात्याची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

रोड ट्रीपमध्ये अनुभवयाला मिळणार नात्याची कमाल गोष्ट… ‘श्री गणेशा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती… वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘श्री गणेशा’ हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘श्री गणेशा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्हीची ट्रेलरमधील झलक उत्सुकता वाढवणारी आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

“अमेय पटनायक इज बॅक…” नवीन ‘रेड’ कोणावर पडणार ? Raid 2 रिलीज डेट जाहीर

‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या ‘श्री गणेशा’ या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे पुन्हा एकदा लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

ट्रेलरची सुरुवातच संजय नार्वेकरने साकारलेल्या भाई वेंगुर्लेकर या व्यक्तिरेखेपासून होते. संजयसोबत शशांक शेंडे आणि प्रथमेश परब हे मुख्य भूमिकेतील कलाकारही आहेत. त्यानंतर ‘रस्ता कसाही असला…’ गाण्याद्वारे नयनरम्य लोकेशन्सची सफर घडते. फूड ब्लॅागर असलेल्या नायिकेची म्हणजेच मेघा शिंदेची एन्ट्री होते आणि ट्रेलरचा प्रवास पुढे सुरू होतो. ‘आली मधुबाला…’ गाण्याचा तडकाही ट्रेलरला आहेच. हा चित्रपट केवळ धमाल-मस्ती नसून, याला पिता-पुत्राच्या नात्याची किनारही जोडण्यात आल्याने ‘उन-सावलीचा चाले खेळ…’ हे गाणे येताच जाणवते. ‘कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही’, हा डायलॅाग मनाला भिडतो. ट्रेलरच्या शेवटी पुन्हा संजय नार्वेकरचे कॅरेक्टर आपल्या अनोख्या शैलीत भेटतो. प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना ‘श्री गणेशा’ चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दाखवणारा असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा असल्याचे मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केले आहे.

‘पुष्पा २’ मधील खलनायक फहाद फासिलचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीसह करणार रोमान्स!

‘श्री गणेशा’ चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली आहे. मिलिंद यांनीच संजय नवगिरे यांच्या साथीने पटकथालेखनही केले आहे. संवाद लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे यांनी सांभाळली आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी, तर संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून विनोद शिंदे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.

Web Title: Shashank shendye sanjay narvekar prathamesh parab starrer shri ganesha marathi movie trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 04:29 PM

Topics:  

  • marathi film
  • Shashank Shende

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
2

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज
3

‘बिन लग्नाची गोष्ट’ मधील पाहिलं गाणं रिलीज, प्रिया बापट आणि भारती आचरेकरचा लाभला आवाज

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4

Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.