फोटो सौजन्य: Instagram
गेल्या अनेक महिन्यांपासून साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला लग्नाच्या बेढीत अडकणार असल्याची चर्चा होत होती. या जोडप्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये आपल्या साखरपुड्याची फोटोस शेअर करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला होता. आता अभिनेत्री शोभिता धुलिपालाने चाहत्यांना परत एक सरप्राइज दिला आहे. साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता लवकरच लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे विधीही सुरू झाले आहेत.
शोभिता धुलिपालाने तिच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हसत हसत हळद दळताना आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. चला, शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्या विधींचे फोटोज आपण पाहून घेऊया.
हे देखील वाचा: ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘वनवास’, नाना पाटेकरांसोबत दिसणार उत्कर्ष शर्मा
अभिनेता नागा चैतन्य हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा मेगास्टार नागार्जुनचा मुलगा आहे. त्याने अनेक साऊथच्या चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसेच त्याने आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटात सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती. परंतु तो चर्चेत आला ते त्याच्या आणि त्याची एक्स वाइफ सामंथा मधील घटस्फोटाच्या बातमीमुळे. गेल्या काही वर्षांपासून नागा चैतन्य आणि सामंथा प्रभू यांच्यात वादाची ठिणगी पडली होती, जिचे रूपांतर पुढे घटस्फोटात निर्माण झाले. या घटनेमुळे दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांचे मन दुखावले होते. पण यानंतर ऑगस्टमध्ये नागा चैत्यनने अभितेरी शोभिता धुलीपालासोबत साखरपुडा केला व त्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले.
शोभिता धुलिपाला ही एक अभिनेत्री आहे, जी मुख्यतः हिंदी सिनेविश्वात काम करते. अनुराग कश्यपच्या ‘रमन राघव’ चित्रपट तिने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले होते. तसेच अमेझॉन प्राइम व्हिडिओ ‘वरील मेड इन हेव्हन’ या वेब सिरीजमध्येही ती झळकली होती. पण तिच्या नावाची खरी चर्चा ही तेव्हा झाली जेव्हा तिने नागा चैतन्यसोबत साखरपुडा केला.