'या' दिवशी प्रदर्शित होणार 'वनवास', नाना पाटेकरांसोबत दिसणार उत्कर्ष शर्मा
प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा हे आउट ऑफ द बॉक्स चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी वीर गदरसारखे अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं असून आता अनिल शर्मा पुन्हा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अनिल शर्मा आता पुन्हा एकदा काहीतरी वेगळे घेऊन लोकांसमोर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनिल शर्मांचा आगामी चित्रपट वनवास बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कलियुगातील रामायणाची कथा दाखवणाऱ्या या चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे.
हेदेखील वाचा- इशा अंबानी ठरली ‘आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड’ची मानकरी! स्टाईल स्टेटमेंटने जिंकली सर्वांची मनं
‘गदर: एक प्रेम कथा’ आणि ‘गदर 2’ यांसारख्या जबरदस्त ॲक्शन ओरिएंटेड चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले अनिल शर्मा आता कलियुगाचे रामायण दाखवणार आहे. त्यांच्या ‘वनवास’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अनिल शर्मा आपल्या चित्रपटांमध्ये जबरदस्त ॲक्शन दाखवण्यासाठी पुन्हा एकदा एका नवीन कथेसह सज्ज झाले आहेत. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
दसऱ्याच्या मुहूर्तावर अनिल शर्मा यांनी वनवास चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. वनवास चित्रपटात आपल्या प्रियजनांच्या विश्वासाची कहाणी दाखवली जाणार आहे. ‘वनवास’मध्ये कलियुगातील रामायण दाखवण्यात येणार आहे. नव्या युगात कोण कोणाला घरापासून आणि प्रियजनांपासून वर्षानुवर्षे दूर ठेवतो, अशी अनिल शर्मा यांच्या आगामी चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाची कथा एका अशा काळातीत थीमला स्पर्श करते, जिथे कर्तव्य, सन्मान आणि एखाद्या व्यक्तीच्या कार्य त्याच्या आयुष्यात काय परिणाम करतात हे दाखवले जाईल.
वनवास या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये दोघेही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. नाना पाटेकर यांच्या हातात पिशवी आहे. अपने ही देते है अपनों को वनवास, या टॅगलाइनसह चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा- सलमान खानने आयुष्यात पहिल्यांदाच ‘लॉरेन्स बिश्नोई’ ग्रहणावर सोडलं मौन, वीकेंड का वारमध्ये दिली प्रतिक्रिया
पोस्टरमध्ये उत्कर्ष शर्मा मद्यपान केल्यासारखा दिसत आहे. त्याच वेळी, नवीन पोस्टरसह, रिलीजची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. ‘वनवास’ हा चित्रपट यावर्षी 20 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी हा चित्रपट झी स्टुडिओवर OTT वर देखील दिसणार आहे.
वनवास या चित्रपटाच्या निमित्ताने नान पाटेकर आणि उत्कर्ष शर्मा एकत्र काम करणार आहेत. वनवास या चित्रपटाबाबत अनिल शर्मा म्हणाले की, हा चित्रपट खऱ्या रामायणापेक्षा वेगळी कथा आहे, जिथे मुले त्यांच्या पालकांना वनवासात पाठवतात. हे कलियुगातील रामायण आहे, जिथे लोक आपल्याच लोकांना वनवासात पाठवतात. चित्रपटात आजच्या काळाप्रमाणे ‘वनवास’चे सत्य दाखवण्यात येणार आहे.