मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Sidharth Jadhav) नेहमीच वेगवगेळ्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो. सिद्धार्थ प्रेक्षकांसाठी ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) हा भन्नाट टीव्ही शो घेऊन येत आहे. १० सप्टेंबरपासून हा शो स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सुरु होणार असून यानिमित्ताने ‘आता होऊ दे धिंगाणा’ ची सीडीचे लाँच करण्यासाठी सिद्धार्थ जाधव लालबाग (Lalbag) येथे पोहोचला.
‘आता होऊ दे धिंगाणा’ हा भन्नाट कार्यक्रमाच सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार आहे. स्टार प्रवाहचा हा नवा कोरा कार्यक्रम म्हणजे अंताक्षरीचा भन्नाट प्रयोग म्हणता येईल. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या या नव्या कार्यक्रमातही प्रेक्षकांना मराठी गाण्यांचा आस्वाद घेता येईल. स्टार प्रवाह परिवारातल्या दोन मालिकांच्या टीममध्ये ही अनोखी सांगितिक लढत रंगणार आहे. पण हा नुसता म्युझिकल कार्यक्रम नाही. तर, बरेच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती जमतीही या मंचावर उलगडणार आहेत.
सिद्धार्थ जाधव याने मुंबईतील लालबागचा राजा (Lalbag cha Raja) आणि गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाच्या (Mumbai Cha Raja) चरणी नतमस्तक होत आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाच्या डीव्हीडीचे लाँच केले. सिद्धार्थने गणरायांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या चरणावर सीडी ठेऊन नवीन कार्यक्रमासाठी प्रार्थना केली.