
या मालिकेला वर्ष ही झालं नाही तेच आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कोण होतीस तू काय झालीस तू मालिका प्रसारित झाली तेव्हा ती 8 वाजताच्या प्राईम टाईमला लागत असे मात्र त्यांनतर मालिकेची वेळ दोनदा बदलण्यात आली. पण त्यानंतर ही मालिका 11 वाजताच्या प्रसारित व्हायला लागली त्यानंतर पुन्हा या मालिकेची वेळ बदलण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा ही मालिका रात्री 10.30 वाजता अजूनही प्रसारित करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्या चर्चांवरच आता पूर्णविराम लागला आहे.
मालिकेतील मुख्य नायिका अभिनेत्री गिरीजा प्रभू याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यामुळे या सगळ्याला पूर्णविराम मिळालेला आहे. दरम्यान गिरीजाने याबाबतची स्टोरी सोशल मीडियावर शेअर केली. येत्या नवंवर्षात स्टार प्रवाह वाहिनीवर, मी सावित्री ज्योतिबा फुले ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही मालिका 5 जानेवारीपासून 7.30 वाजता प्रसारित करण्यात आली. यामुळे घरोघरी मातीच्या चुली मालिकेची वेळ बदलण्यात आली. ही मालिका आता 5 जानेवारीपासून 10.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.