Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी, भाईजानच्या मोस्ट अवेटेड ‘सिकंदर’ चा टीझर केव्हा रिलीज होणार ?

येत्या २७ डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे. भाईजानच्या वाढदिवशी त्याच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 16, 2024 | 02:13 PM
सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी, भाईजानच्या मोस्ट अवेटेड 'सिकंदर' चा टीझर केव्हा रिलीज होणार ?

सलमान खानच्या चाहत्यांना मिळणार लवकरच आनंदाची बातमी, भाईजानच्या मोस्ट अवेटेड 'सिकंदर' चा टीझर केव्हा रिलीज होणार ?

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता सलमान खान कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्मा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाईजान त्याच्या ‘सिकंदर’ या अपकमिंग चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. डिसेंबर महिना भाईजानसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी खास ठरणार आहे. येत्या २७ डिसेंबरला भाईजानचा वाढदिवस आहे. भाईजानच्या वाढदिवशी त्याच्या ह्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर रिलीज होणार आहे. चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

करणवीर मेहरामुळे विवियन डिसेना मोडणार शिल्पासोबतचं नातं?

सलमान खानसाठी हा चित्रपट महत्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या दरम्यानच अभिनेत्याने चित्रपटाची शुटिंग आटोपली आहे. चित्रपटाची संपूर्ण शुटिंग अभिनेत्याने कडक सुरक्षाव्यवस्थेत केली. अद्याप शुटिंग सुरू असून मुंबईमध्ये अभिनेता शुटिंग करीत आहे. यापूर्वी हैद्राबादमध्ये चित्रपटाचं शेड्युल्ड होतं, ते पूर्ण झालं आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाची निर्मिती सलमान खानचा खास मित्र आणि निर्माते साजिद नाडियादवाला करणार आहेत. तर चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक ए.आर.मुरुगदोस करत आहेत.

‘मुफासा द लायन किंग’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, चाहते शाहरुख खान आणि अबरामचा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक!

सध्या चित्रपटाच्या फायनल शेड्युलचं शूट सुरु असून क्लायमॅक्स शूट करायचा बाकी आहे. जानेवारीच्या शेवटापर्यंत चित्रपटाचं शूट पूर्ण होणार आहे. दरम्यान ‘सिकंदर’ चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदानाही स्क्रिन शेअर करणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर या ॲक्शनपॅक्ड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. सलमानचे चाहते या बहुचर्चित चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. येत्या २७ डिसेंबर रोजी सलमान खानचा ५९ वा वाढदिवस आहे. सलमान त्याच्या वाढदिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाचा टीझर रिलीज करत आपल्या चाहत्यांना गिफ्ट देईल, अशी चर्चा होत आहे. शिवाय, चित्रपटाचं पोस्टरही त्याच दिवशी रिलीज केलं जाणार, अशी चर्चा होत आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी हे खास सरप्राईज असणार, हे नक्की.

परदेशात ‘गेम चेंजर’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू; राम चरण आणि कियाराला पाहण्यासाठी चाहते आतुर!

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानच्या ५९ व्या वाढदिवशी सलमान खानचे ‘सिकंदर’ चित्रपटातील फर्स्ट लूक पोस्टर आणि टीझर लाँच केला जाईल. २०१४ मध्ये रिलीज झालेल्या ‘किक’ चित्रपटानंतर सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला ‘सिकंदर’ चित्रपटातून पुन्हा एकत्र येणार आहे. रिपोर्टमध्ये विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या टीझर कटिंगच्या एडिटिंगचे काम जोरात सुरू आहे. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला ग्रँडसन निर्मित ‘सिकंदर’ हा ॲक्शनपॅक्ड सिनेमा २०२५ मधील ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खान व्यतिरिक्त चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी, अंजनी धवन, सत्यराजदेखील अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सध्या चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.

Web Title: Sikandar teaser release on salman khan 59th birthday on 27th december sajid nadiadwala a r murugadoss film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
1

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!
2

Bigg Boss 19 मधून या आठवड्यात कोण होणार घराबाहेर? नॉमिनेटेड ८ स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाची उघडणार एक्सिट डोअर!

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
3

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?
4

Bigg Boss 19 : घरातलं वातावरण चिघळलं, फरहाना आणि अशनूरमध्ये झाला राडा! सलमान कठोर निर्णय घेईल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.