Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan: सलमान खानच्या ‘मातृभूमी’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; रिलीज डेटबाबत महत्त्वाची माहिती समोर!

Salman Khan: : सलमान खानच्या ‘मातृभूमी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. याच शुक्रवारी मुंबईत भव्य कार्यक्रमात ट्रेलर लॉन्च होण्याची शक्यता; चित्रपटाच्या रिलीज डेटकडे चाहत्यांचे लक्ष.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 05, 2026 | 01:54 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Salman Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ‘मातृभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर याच शुक्रवारी मुंबईत लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘व्हरायटी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सणासुदीच्या काळाचा फायदा घेण्यासाठी चित्रपटाचे निर्माते मुंबईत एका भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रोडक्शन हाऊसकडून अद्याप ट्रेलर लॉन्चची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सलमान खानच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कधी पार पडणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

‘बॅटल ऑफ गलवान’ नावाने झाली होती चित्रपटाची घोषणा

सलमान खानच्या या चित्रपटाची घोषणा सर्वप्रथम जुलै २०२५ मध्ये ‘बॅटल ऑफ गलवान’ या नावाने करण्यात आली होती. चित्रपटाच्या पूर्वनिर्मितीचे काम २०२४ मध्येच सुरू झाले होते. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलून ‘मातृभूमी’ असे ठेवले. हा चित्रपट १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते.

या चित्रपटात सलमान खान एका शूर भारतीय लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्याचे पात्र कर्नल बिकुमल्ला संतोष यांच्या शौर्यापासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. अपूर्व लाखिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सलमानसोबत चित्रांगदा सिंह आणि प्रशांत तामांग हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटात झाले अनेक बदल आणि पुनर्चित्रीकरण

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या कथेत चीनच्या चित्रणावर प्रश्न उपस्थित झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर निर्मात्यांनी या प्रकरणाची दखल घेत कथेमध्ये आवश्यक बदल केले आणि काही दृश्यांचे पुनर्चित्रीकरणही केल्याचे वृत्त समोर आले होते. चित्रपटाला नुकतेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे. मात्र, अद्याप केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) अधिकृत प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे.

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष

१३ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार?

दरम्यान, ‘मातृभूमी’च्या प्रदर्शनासाठी १३ नोव्हेंबर ही तात्पुरती तारीख चर्चेत आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या संभाव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रदर्शनाची निश्चित तारीख जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सलमान खानच्या या देशभक्तीपर चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार आणि त्यातून प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Web Title: Salman khan maatrubhumi trailer launch release date update ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • bollywood movies
  • entertainment
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं
1

Raghav Juyal: रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये राघव जुयालची एन्ट्री! मेघनादच्या भूमिकेत अवघ्या ५ सेकंदांत जिंकली प्रेक्षकांची मनं

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष
2

‘रामायण’चा जगभरात डंका! रणबीर कपूरच्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच कमावले १५० कोटींहून अधिक; ओपनिंगकडे सर्वांचे लक्ष

OTT Releases 6 November:ओटीटी प्रेक्षकांसाठी खुशखबर! ६ नोव्हेंबरला रिलीज होणार ५ नवे चित्रपट आणि सीरिज; पाहा संपूर्ण यादी!
3

OTT Releases 6 November:ओटीटी प्रेक्षकांसाठी खुशखबर! ६ नोव्हेंबरला रिलीज होणार ५ नवे चित्रपट आणि सीरिज; पाहा संपूर्ण यादी!

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?
4

Aamir Khan: गौरी स्प्रॅटशी लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांतच आमिर खानवर घर सोडण्याची वेळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.