
राहुल वैद्यने टीव्ही आणि बॉलीवूड स्टार्सना फटकारले (फोटो सौजन्य - Instagram)
यासोबतच सामान्य लोकांनीही कुत्र्यांच्या बचावासाठी मोर्चा काढला. पण आता ‘बिग बॉस १४’ आणि ‘लाफ्टर शेफ्स’ फेम राहुल वैद्यने या निर्णयाचे समर्थन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राहुलने कौतुक केले आहे, तसेच त्यांच्यासोबत झालेल्या अपघाताचा उल्लेखदेखील त्याने सोशल मीडियावर केला आहे. एवढेच नाही तर राहुल वैद्यने असेही म्हटले आहे की ‘ज्यांना भटक्या कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे त्याने त्यांना त्यांच्या घरी घेऊन जावे’
दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी दाखवला त्यांच्या छोट्या परीचा चेहरा, व्हिडीओ व्हायरल
काय आहे राहुलची इन्स्टाग्राम स्टोरी
राहुल वैद्यने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. त्याच्या एका स्टोरीत त्याने लिहिले की, “मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याचे समर्थन करतो. मला कुत्रे आवडतात, पण गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे, ‘भटक्या कुत्र्यांमुळे समाजाची उपेक्षा दिसून येते, करुणा नाही.’ राहुल वैद्य केवळ हेच बोलून थांबला नाही तर स्वतःचा अनुभवही त्याने या पोस्टमध्ये शेअर केलाय.
राहुल वैद्यने सांगितले की २०२१ मध्ये त्यांना एका कुत्र्याने चावा घेतला होता, जो एक भटका कुत्रा होता पण त्याला एका अभिनेत्याने वाढवले होते. खुणा दाखवत राहुल वैद्यने सांगितले की, “२०२१ मध्ये मला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता, तो एका अभिनेत्याचा कुत्रा आहे. तो एक भटका कुत्रा होता, जो त्याने वाढवला होता. आणि जेव्हा मी त्या इमारतीतील मुलांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्याने अनेक वेळा लोकांना चावले आहे. आणि विशेष म्हणजे हा अभिनेता क्राइम पेट्रोल होस्ट करतो.” तथापि, नंतर राहुल वैद्य यांनी स्पष्ट केले की अभिनेता क्राइम पेट्रोल होस्ट करत नाही तर अशाच प्रकारचा शो करतो.
Kedarnath Helicopter Crash वर राहुल वैद्यने व्यक्त केला संताप, म्हणाला ‘मानवी जीवनाचे शून्य मूल्य…’
विरोधकांवरही टीका
राहुल वैद्यने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवरही टीका केली. त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याने पुढे लिहिले की, “जर तुम्हाला भटके कुत्रे इतकेच आवडत असतील तर कृपया त्यांना घरी घेऊन जा. सोशल मीडियावर लांबलचक कथा पोस्ट करून आणि न्यायालयाच्या निर्णयावर टीका करत फिरू नका, ज्याला मीडियाने आणखी उत्तेजन दिले आहे. प्राण्यांवरील प्रेम आणि आपुलकीचा सदर मुद्द्याशी काहीही संबंध नाही.”
याआधी विराट कोहलीसंबंधित पोस्टवरून राहुल वैद्य खूपच ट्रोल झाला होता. मात्र आता या मुद्द्यावरून पुन्हा प्रकरण त्याच्या अंगलट येणार की, कोणी त्याला पाठिंबा देऊ शकतं हे पाहवं लागेल.