"पहिले तुझे आई-वडील, मग...", ट्रोलरने केलेल्या घटस्फोटाच्या कमेंटवर भडकली सोनाक्षी सिन्हा, थेट दिलं सडेतोड उत्तर
आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात नक्की काय चाललंय ? याची चाहत्यांना फार उत्सुकता असते. खासगी आयुष्यासह त्याच्या फिल्मी लाईफपर्यंत त्यांना जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. पण आता एका चाहत्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्यामधील गोष्टी जाणून घेणं महागात पडलं आहे. त्या कलाकारानं चाहत्याला थेट प्रत्युत्तर देत त्याची बोलतीच बंद केलीये. हा प्रकार घडलाय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत… सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने जून २०२४ मध्ये आंतरधर्मीय लग्न केले. सोनाक्षी हिंदू असून झहीर मुस्लीम आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर आता सोनाक्षी आणि झहीरच्या घटस्फोटाबद्दल एका चाहत्याने कमेंट केली आहे. त्या कमेंटकडे सोनाक्षीने दुर्लक्ष न करता त्याला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलं.
हातात झाडू अन् कमरेला खोचलेली साडी, राधिकाचा नव्या चित्रपटातला हटके लुक रिलीज
सोनाक्षी आणि झहीर कायमच इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. लग्नानंतर अनेकदा दोघंही एकमेकांसोबत फिरायलाही गेले आहेत. त्या दरम्यानचे रोमँटिक फोटो ते इन्स्टाग्रामवरही शेअर करत असतात. ट्रीप दरम्यानचे फोटोज् सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्या फोटोवर एका ट्रोलरने तिच्या घटस्फोटाबाबत कमेंट केली. ट्रोलरने केलेल्या कमेंटकडे अभिनेत्रीने दुर्लक्ष न करता त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. सोनाक्षीने संबंधित युजरला दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. दरम्यान, सोनाक्षीने शेअर केलेल्या एका फोटोवर ट्रोलरने ‘तुझा घटस्फोट तुझ्या खूप जवळ आला आहे’, अशी कमेंट केली. त्या फोटोवर सोनाक्षीने ट्रोलरला थेट सडेतोड उत्तर देत त्याची बोलतीच बंद केलेली आहे.
उत्तर देत सोनाक्षी म्हणते, ‘आधी तुझे आई-वडील घटस्फोट घेतील, मग आम्ही. प्रॉमिस (वचन).’ तिच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. सोनाक्षी आणि झहीरने जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्याही आधी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाली होती. परंतु वेळोवेळी तिने ट्रोलर्सला उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद केलं आहे. सोनाक्षीनं नेटकऱ्याला दिलेल्या या प्रत्युत्तराची चर्चा सध्या खूप होतं आहे. तिचे आणि झहीरचे चाहते दोघांना समर्थन करत आहेत. अनेक चाहते सोनाक्षी आणि झहीरची परफेक्ट जोडी असल्याचं म्हणत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोनाक्षी प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली होती. तिने एका मुलाखतीत थेट प्रत्युत्तर देत सर्वांचीच बोलती बंद केली होती.
वादाच्या भोवऱ्यात पुन्हा अडकला ‘Jaat’, सनी देओलच्या चित्रपटावर एफआयआर दाखल!
सोनाक्षी एका मुलाखतीत बिनधास्तपणे उत्तर देत म्हणाली होती की, “मी इथे स्पष्ट करू इच्छिते की मी प्रेग्नंट नाही. मी फक्त जाड झाली आहे. त्यादिवशी एका व्यक्तीने झहीरला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावरून आम्हाला समजलं की काहीतरी गडबड आहे. आम्ही आमचं लग्न एन्जॉय करू शकत नाही का ? आमच्या लग्नाला फक्त सहा महिने झाले आहेत आणि प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास आम्ही दोघं प्रवासातच खूप व्यस्त आहोत. आम्ही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतोय आणि सतत कोणत्या ना कोणत्या लंच किंवा डिनरला जातोय.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली होती.