(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सनी आणि रणदीपचा हा चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकत चालला आहे असे दिसते आहे. ‘जाट’ चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे आणि आता त्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या बातमीने सगळेच चकित झाले आहेत. संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
Karan Johar: ५२ वर्षीय करण जोहरने १७ किलो वजन का केले कमी? निर्मात्याने स्वतःच केला खुलासा!
संपूर्ण प्रकरण काय आहे?
जालंधरचे रहिवासी विल्केल गोल्ड यांनी चित्रपटात प्रभु येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर चढवण्याचे दृश्य चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला आहे. केवळ चित्रपटच नाही तर सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार, दिग्दर्शक गोपी चंद आणि चित्रपटाचे निर्माते नवीन येरनेनी यांच्यावरही धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.
ख्रिश्चन समुदायाचे आरोप
या सर्व लोकांविरुद्ध जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात कलम २९९ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे उल्लेखनीय आहे की जालंधरमधील फोल्डिवल गावातील रहिवासी विकोल्फ गोल्ड यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर काळ ‘जाट’ चित्रपटात प्रभु येशू ख्रिस्ताचे दृश्य चुकीचे दाखवल्याबद्दल ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी पोलिस आयुक्तालय कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती.
एआर रहमानने एक महिन्यानंतर शेअर केली हेल्ड अपडेट; वैयक्तिक आयुष्याबद्दलही केला खुलासा!
पोलिसांनी दिले चौकशीचे आश्वासन
त्याचबरोबर अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्यासाठी मागणी पत्रही देण्यात आले. ‘जाट’ चित्रपटातील प्रभु येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर चढवण्याच्या दृश्याचे अनुकरण करून ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आरोपींनी पोलिस तक्रारीत केला आहे. चित्रपटात अशी दृश्ये जाणूनबुजून दाखवण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे. ‘जाट’च्या निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. ‘जाट’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.