Sonakshi Sinha And Zaheer Iqbaal Photos
बॉलिवूडची ‘दबंग’ गर्ल म्हणून चर्चेत राहिलेल्या सोनाक्षी सिन्हासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. कारण आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे. ठिक सहा महिन्यांपूर्वी २३ जून २०२४ रोजी सोनाक्षी आणि झहीरने रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करत बॉलिवूडमधील कलाकारांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्या लग्नाची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये जोरदार चर्चा झाली होती. काल त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले. त्यानिमित्त हे कपल सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.
गायक शान राहत असलेल्या इमारतीला भीषण आग, कुटुंब सुखरूप ; चाहत्यांची चिंता मिटली
२३ डिसेंबरच्या दिवशी सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला ६ महिने पूर्ण झाले आहेत. या कपलने लग्नाला ६ महिने झाल्यानिमित्त परदेशात जबरदस्त सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर करत नवऱ्यासोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोला अभिनेत्रीने “हॅप्पी सिक्स मंथ जान…” आणि पुढे हार्ट इमोजी देत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केला आहे. लग्नाला ६ महिने झाल्यानिमित्त सोनाक्षी आणि झहीरने ऑस्ट्रेलियामध्ये सेलिब्रेशन केलं आहे. सोनाक्षी आणि झहीरच्या ह्या इन्स्टा स्टोरीची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत असून त्यांच्यावर कमेंट्सचाही वर्षाव केला जात आहे.
२३ जून २०२४ ला सात वर्षांपूर्वी म्हणजेच २३ जून २०१७ ला एकमेकांच्या डोळ्यात बघत त्यांनी एकमेकांवर प्रेम केले होते. ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सोनाक्षी सिन्हा शेवटची संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ या वेबसीरीजमध्ये दिसली होती. तिने या सीरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारली होती. आता लवकरच सोनाक्षी-जहीर ‘तू है मेरी किरण’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक रोमॅंटिक थ्रिलर चित्रपट असून करण रावल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.