‘सृजन द क्रिएशन’ (Srujan The Creation) संस्थेला १५ मे रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. आज जवळपास १६ ऑनलाईन आणि ५ प्रत्यक्षातल्या कार्यशाळा झाल्या. त्यातून हे कुटुंब विस्तारत आहे. वय वर्ष ७ ते ७० या वयोगटातली लोक इथं एकत्र येऊन अनेक गोष्टी सोबत करत आहेत. अनेक मान्यवरांनी ‘हातचं काही राखून न ठेवता’ त्यांना मार्गदर्शन केलं, करीत आहेत.
[read_also content=”मनपाच्या डम्पिंग यार्डला भीषण आग लागून परिसर धुरांच्या विळख्यात, आमदार किशोर जोरगेवार यांनी केली तात्काळ पाहणी https://www.navarashtra.com/maharashtra/mla-kishor-jorgewar-conducts-immediate-inspection-of-municipal-corporations-dumping-yard-nraa-278290.html”]
सृजन संस्थेचे कलाकार येत्या रविवारी १५ मे रोजी सकाळी १०.०० ते रात्री ११.०० असा ९ एकांकिकांचा एक भव्य एकांकिका महोत्सव (One Act Play Competition) प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली (Borivali) येथे साजरा करणार आहेत.
या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सादर होणार असून रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी केले आहे.






