पुण्यात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन पावडरच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीवर कठोर भूमिका मांडली. ‘मसल गेन’च्या नावाखाली खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या जिम चालक, उत्पादक, विक्रेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. तपासणी अहवालाचा कालावधी ३० दिवसांवरून २० दिवसांवर आणण्यात आला असून तो लवकरच १४ दिवसांवर आणण्याचा FDA चा प्रयत्न आहे. यासह इंदू केअर कंपनीवरील कारवाई आणि आरक्षणासंदर्भातील वक्तव्यांवरही त्यांनी भाष्य केले.